मराठमोळी अभिनेत्री मुग्धा गोडसे तिचा बॉयफ्रेंड राहुल देवमुळे चर्चेत आहे. राहुल आणि मुग्धाच्या वयात तब्बल 14 वर्षांचं अंतर आहे. मात्र असा वयातील फरक असणार हे एकमेव कपल नाही. याआधी अशी अनेक कपल आहेत ज्यांच्या वयात मुग्धा-राहुलपेक्षाही जास्त अंतर आहे...
2/ 8
देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनस डिसेंबर 2018 मध्ये विवाह बंधनात अडकले. पण त्यापूर्वी त्यांच्या वयातील अंतरावरून अनेक चर्चा रंगल्या. निक आणि प्रियांकाच्या वयात जवळपास 11 वर्षांचं अंतर आहे. पण ही आमच्यासाठी नगण्य बाब असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
3/ 8
पतोडी खानदानाचा नवाब सैफ अली खान आणि बेबो करीना कपूर यांनी 2012 मध्ये लग्न केलं. दोघांच्या वयात तब्बल 10 वर्षांचं अंतर आहे. आता करीना 38 तर सैफ 48 वर्षांचा आहे.
4/ 8
अभिनेता संजय दत्तनं 2008 मध्ये मान्यताशी लग्न केलं होतं. मान्यता संजयपेक्षा 20 वर्षांनी लहान आहे. या दोघांना शहरान आणि इकरा अशी दोन जुळी मुलं आहेत.
5/ 8
मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर यांनी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात लग्न केलं. आजही त्यांना, त्यांच्या वयातील अंतरामुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. मिलिंद आणि अंकिता यांच्या वयात तब्बल 25 वर्षांचं अंतर आहे.
6/ 8
बॉलिवूडमधील क्यूट जोडी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच लग्न करतील अशा चर्चा आहेत. या दोघांनीही मागील वर्षी आपल्या नात्याची कबूली दिली होती. त्यानंतर दोघंही अनेकदा एकमेकांच्या फॅमिली सोबत वेळ घालवताना दिसतात. या दोघांच्या वयामध्ये 10 वर्षांचं अंतर आहे.
7/ 8
अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा रजपूतनं 2015 मध्ये लग्न केलं. या दोघांना मिशा आणि झेन अशी दोन मुलं आहे. शाहिद मीरापेक्षा 14 वर्षांनी मोठा आहे. याच कारणाने मीरानं सुरुवातीला शाहिदशी लग्न करण्यास नकार दिला होता.
8/ 8
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेतील जोडी आहे. या दोघांनी अद्याप आपल्या नात्याची कबूली दिली नसली तरी ते लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं बोललं जात आहे. अर्जुन मलाइकाच्या वयात 12 वर्षांचं अंतर आहे. सध्या मलाइका 42 तर अर्जुन 33 वर्षांचा आहे.