मुंबई, 14 एप्रिल: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची
(Sushant Singh Rajput) गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती
(Rhea Chakraborty) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सुशांतच्या कुटुंबीयांनी सुशांतच्या मृत्यूबाबत रियावर केलेल्या खळबळजनक आरोपानंतर, सुशांतची जवळची मैत्रीण स्मिता पारिखने
(Smita Parikh) पुन्हा एकदा रियावर काही गंभीर आरोप केले आहेत. सुशांतच्या आधी रिया चक्रवर्ती आदित्य रॉय कपूरला
(Aditya Roy Kapur) डेट करत होती. सुमारे दोन वर्षांपर्यंत दोघं रिलेशनशीपमध्ये
(Relationship) होते. पण त्यानंतर दोघांत वाद झाल्यानंतर दुरावा निर्माण झाला होता.
स्मिता पारिख यांनी केलेल्या ट्वीटनंतर रिया चक्रवर्तीची जुनी लव्ह लाइफ पुन्हा चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि रिया चक्रवर्ती दोघांनीही आपल्या जुन्या संबंधाबाबत मौन बाळगलं आहे. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या प्रेमाचा शेवट वाईट झाला होता. रियानं 2012 मध्ये एका तेलगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर 2013 मध्ये आलेल्या 'मेरे डॅड की मारुती' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मोठ्या स्क्रीनवर बोल्ड सीन देण्यास देखील रिया चक्रवर्तीने संकोच केला नव्हता.
मीडिया रिपोर्टनुसार, रिया चक्रवर्तीने तिच्या 'सोनाली केबल' या चित्रपटात अली फजलसोबत किसींग सीन घेण्यास नकार दिला होता. पण 'आशिकी 2' मध्ये जेव्हा आदित्य रॉय कपूरने श्रद्धा कपूरला बड्या पडद्यावर किस करताना पाहिलं. तेव्हा रियानं आदित्यशी बदला घेण्यासाठी अलीसोबत किसींग सीन दिला होता. रियाच्या बोल्ड सीनमुळे ती बॉलिवूडमध्ये बरीच चर्चेत आली होती.
हे ही वाचा- डिप्रेशन नाही तर 'या' कारणामुळे सुशांतनं केली आत्महत्या? नवी माहिती आली समोर
खरंतर, अदित्य रॉय कपूर आणि रिया चक्रवर्तीच्या प्रेमाची बॉलिवूडमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अशाही बातम्या समोर आल्या की, दोघांमध्ये बोलणं सुरू आहे. पण दोघांनीही त्यांच्या रिलेशनबाबत अधिकृत दुजोरा दिलेला नाही. गेल्या वर्षी सुशांतने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर रिया चक्रवर्ती वाद्याच्या भोवऱ्यात सापडली होती. तिच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. सुशांतला आत्महत्येसाठी रियानं प्रवृत्त केल्याचा आरोपही सुशांतच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.