मुंबई, 06 जानेवारी : अभिनेत्री उर्फी जावेद प्रकरण आणखी चिखळण्याची शक्यता आहे. उर्फीनं नुकताच भगव्या रंगाच्या विचित्र कपड्यांमध्ये व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात पठाण सिनेमातील बेशरम रंग गाणं वाजवण्यात आलं. या व्हिडीओ प्रचंड चर्चा झाली. पठाण सिनेमामुळे निर्माण झालेल्या वादात भगव्या रंगावरून चांगलंच राजकारण रंगलं. त्यानंतर उर्फी प्रकरणात महाराष्ट्रातील महिला राजकारणी आमने सामने आल्यात. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी विरोधात तक्रार दाखल केली तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उर्फी प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं. यावरून चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यात चांगली जुंपली. काल चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत उर्फी आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर ताशेरे ओढले. तर आज रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत केलेल्या आरोपांवर उत्तर दिली. दरम्यान रुपाली चाकणकर यांनी ‘कोणी कोणते कपडे घालावे हा त्यांचा अधिकार असल्यानं महिला आयोग यात लक्ष घालणार नाही, अशी त्यांची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर आता रुपाली चाकणकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नेसलेल्या साडीच्या रंगावरून वेगळ्याच चर्चा रंगल्या आहेत. हेही वाचा - उर्फी प्रकरणी चित्रा वाघ यांचे आरोप चुकीचे, राज्य महिला आयोगानेच धाडली उलट नोटीस आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत चित्रा वाघांनी केलेले आरोप खोटे असल्याचं सांगितलं. अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या अनुराधा वेब सीरिजच्या वेळी नोटीस अभिनेत्रीला नाही तर दिग्दर्शक संजय जाधव यांना पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. महिला आयोगाच्या नोटीसीनंतर दिग्दर्शक संजय जाधव यांनी त्यांची भूमिका मांडली. दरम्यान, आम्ही तेजस्विनी पंडितचा संबंधित पत्रात कुठेही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे चित्रा वाघ यांनी दिलेली माहिती खोटी असल्याचं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं.
चित्रा वाघांनी समाजमाध्यमांनी दिलेली माहिती खोटी असल्याचं सांगत महिला आयोगानं चित्रा वाघांनाच नोटीस पाठवली. स्वत:च्या प्रसिद्धीसाठी आणि आकसापोटी आयोगावर जी भूमिका घेतलीय या प्रकरणी आम्ही चित्रा वाघ यांना नोटीस पाठवतोय, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता उर्फी वादाचे बदलते रंग पाहायला मिळत आहेत.