मुंबई, 05 ऑक्टोबर ; अभिनेत्री रूचिरा जाधव (Ruchira Jadhav) ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघराच पोहोचली. रूचिरा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. रूचिरा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे काही फोटो व व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. रूचिराने नुकताच एका ट्रेंडवर (Bend Over In Nauwari Saree) नऊवारी साडीवर डान्स केला आहे. आतापर्यंत या ट्रेंडवर अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी डान्स केला आहे. मात्र रूचिराचा हा हटके अंदाज चाहत्यांना खूप आलडलेला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल तर होत आहेच पण नेटकरी तिचे कौतुक देखील करत आहे. रूचिराने तिच्या इन्स्टावर लाल रंगाच्या नऊवारी साडीतील एक व्हिडिओ शेअर केला आहे. रूचिराचा मराठमोळा लुक चाहत्यांना भलताच आवडला आहे. लाल रंगाच्या नऊवारी साडीत रूचिरा खूपच सुंदर दिसक आहे. लाल रंगाची नऊवारी आणि त्यावर तिने पारंपारिक दागिने घातले आहेत. या व्हिडिओमध्ये रूचिर बेंड ओव्हर डान्स हा ट्रेंड फॉलो करताना दिसत आहे. या इंग्रजी गाण्यावर रूचिराचा मराठमोळा ठुमका सर्वांना घायळ करत आहे. चाहत्यांकडून रूचिराच्या या व्हिडिओवर कमेंटचा पाऊस सुरू आहे. वाचा :Bigg Boss Marathi 3 च्या घरात जय पडला प्रेमात! कुणाला केलं प्रपोज पाहा VIDEO रूचिराने हा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, नऊवारी साडीतील बेंड ओव्हर कसं वाटंल ?.. चाहत्यांना देखील रूचिराचा नऊवारी साडीतील बेंड ओव्हर आवडलेले आहे. आतापर्यंत तिच्या या व्हिडिओवर 25 हाजारापेक्षाही जास्त लाईक्स मिळाल्या आहेत. व्हिडिओमुळे रूचिरा सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.
रूचिराला झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मायाची भूमिका साकारली होती. या मालिकेत तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. रुचिराने पराग विद्यालयातून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, मुंबई येथून तिने पदवीचे शिक्षण घेतले.कलर्स मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यावाचून करमेना’ या मालिकेत तिने नुपूरची भूमिका साकारली होती. वाचा : बहिणीच्या साखरपुड्यासाठीही Kapil Sharma कडे नव्हते पैसे, ओढण्या विकून निभावली होती वेळ; आज आहे कोट्याधीश शुद्ध देसी या युट्यूब चॅनलवरील ‘माझ्या मित्राची गर्लफ्रेंड’ या वेब सीरिजमध्येही तिने काम केले आहे.‘प्रेम हे’, ‘बे दुणे दहा’, ‘माझे पती सौभाग्यवती’ अशा काही मालिकांमध्येही तिने काम केले आहे.मालिकांशिवाय तिने नाटक आणि चित्रपटातही काम केलं आहे.‘बंच ऑफ रेड रोजेस’ हे नाटक आणि ‘लव्ह लफडे’ या चित्रपटात तिने भूमिका साकारली आहे.