मुंबई, 5ऑक्टोबर- कपिल शर्मा (Kapil Sharma) हा आजच्या घडीचा टेलिव्हिजन इंडस्ट्रीतला लोकप्रिय चेहरा आहे. ‘द कपिल शर्मा शो’मुळे (The Kapil Sharma Show) तो प्रत्येक घरात ओळखीचा झाला आहे. त्याचा कॉमेडी शो टीआरपीमध्ये सातत्यानं वरच्या क्रमांकावर असतो. कपिल शर्मा सध्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. एक साधारण व्यक्ती ते कॉमेडी किंग होण्यापर्यंतच्या त्याच्या या प्रवासात अनेक चढउतार आले. सुरुवातीच्या काळात त्याने अनेक आर्थिक संकटांचा सामना केला आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तात कपिल शर्माच्या संपत्तीसंदर्भातली माहिती प्रसिद्ध झाली आहे.
कपिलचं कुटुंब अतिशय सर्वसामान्य होतं आणि त्यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. घर चालवण्यासाठी त्याने अनेक व्यवसाय केले होते. एक वेळ अशी आली होती की, बहिणीच्या साखरपुड्यासाठीदेखील कपिलकडे पैसे नव्हते. त्यामुळं कपिलनं ओढण्यांची विक्री करण्याचा व्यवसाय केला होता. पॉकेटमनी मिळवण्यासाठी कपिल बूथवरही काम करत होता. (**हे वाचा:** जेव्हा लग्नाआधी Monalisaने बिग बॉसच्या घरातचं केला होता प्रेग्नेंट असल्याचा…. ) कॉमेडी किंग कपिल शर्माकडे सध्या 282 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. वेगवेगळे शोज, जाहिराती ही त्याच्या कमाईची साधनं आहेत. ‘द कपिल शर्मा शो’ या कॉमेडी शोमधून कपिलची सर्वांत जास्त कमाई होते. याशिवाय इतर शोजसाठी कपिल शर्मा सुमारे 40 लाख ते 90 लाख रुपये मानधन घेतो.कपिल शर्मानं ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या तिसऱ्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. त्या शोच्या वेळी कपिल शर्माला पैशांची अडचण होती. त्यामुळे त्याच्या बहिणीचं लग्नदेखील पुढे ढकलण्यात आलं होतं. शो जिंकल्यानंतर बक्षिसाच्या रकमेतून कपिलनं आपल्या बहिणीचं लग्न केलं. (**हे वाचा:** Shehnaaz Gill च्या नावासमोर या चिमुकल्याने लिहिलं Shukla; चाहते झाले भावुक ) ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शोनंतर कपिल शर्मानं अनेक कॉमेडी शो केले. छोटे मियां, झलक दिख जा आणि कॉमेडी सर्कस यांसारखे शोज होस्टदेखील केले; मात्र ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या शोनं त्याला खऱ्या अर्थानं पैसा आणि प्रसिद्धी मिळवून दिली. सुनील ग्रोव्हरसोबत झालेला वाद आणि काही काळ नैराश्यात गेल्यामुळं कपिलची कारकीर्द संपण्याची शक्यता निर्माण झाली होती; मात्र त्यानं जबरदस्त पुनरागमन केलं.आपल्या करिअरमध्ये यशाच्या वाटेवर चालू लागल्यानंतर कपिल शर्माने 2018 साली गिन्नी चरथशी (Ginni Charath)लग्न केलं. त्यांना अनायरा आणि त्रिशान नावाची दोन अपत्यं आहेत.