मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'RRR' च्या ट्रेलरनंतर चर्चा फक्त राजामौलींची, तरीही स्वत:ला समजतात अपयशी फिल्ममेकर?

'RRR' च्या ट्रेलरनंतर चर्चा फक्त राजामौलींची, तरीही स्वत:ला समजतात अपयशी फिल्ममेकर?

 'बाहुबली' फेम दिग्दर्शक एस.एस. राजामौली (SS Rajamouli) सध्या त्यांच्या आगामी 'आरआरआर' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकताच त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

'बाहुबली' फेम दिग्दर्शक एस.एस. राजामौली (SS Rajamouli) सध्या त्यांच्या आगामी 'आरआरआर' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकताच त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

'बाहुबली' फेम दिग्दर्शक एस.एस. राजामौली (SS Rajamouli) सध्या त्यांच्या आगामी 'आरआरआर' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकताच त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

मुंबई, 12 डिसेंबर - 'बाहुबली' फेम दिग्दर्शक एस.एस. राजामौली (SS Rajamouli) सध्या त्यांच्या आगामी 'आरआरआर' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकताच त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्याचे खूप कौतुक होत आहे आणि त्यासोबत बी-टाउन बॉयकॉट हा हॅशटॅग देखील खूप ट्रेंड करत आहे. राजामौली यांचे कौशल्य पाहून प्रेक्षकांच्या नजरेत पुन्हा बॉलीवूड (Bollywood) फिके पडले आहे. त्यामुळेच सध्या दक्षिण भारतीय निर्मात्यांच कौतुक केले जात आहे. 'RRR'च्या शूटिंगबाबत राजामौली यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले, ज्यांची त्यांनी मनमोकळेपणे उत्तरे दिली.

चित्रपट निर्माते एस.एस. राजामौली यांनी त्यांच्या आगामी ‘रौद्रम रणम रुधिराम’ (RRR) मध्ये दोन टॉप (Ram Charan And junior NTR) आणि एक अभिनेत्री (Alia Bhatt) यांच्यात स्क्रीन स्पेस समानपणे कशी विभागली आणि प्रेक्षकांना प्रभावित केले हे सांगितले आहे. आरआरआर दिग्दर्शक सांगतात की, शूटिंग दरम्यान त्यांचा फोकस नेहमीच त्यांच्या चित्रपटातील पात्रांचा समतोल कसा राखता येईल याकडे असायचा ना की त्यांच्या इमेजवर.

राजामौली त्यांच्या स्टारकास्ट खूप छान हाताळत असत. ते पुढे म्हणाले, 'ज्या क्षणी मी राम चरण, एनटीआर आणि आलिया भट्टला फॉर्ममध्ये पाहायचो त्यावेलीच मी याचा स्क्रीनवर कसा समतोल साधायचा याचा विचार करत असे. चित्रपट निर्माता म्हणून मी अपयशी ठरलो आहे.

वाचा : शेहनाजने असं केलं होतं सिद्धार्थाला बड्डे विश, जुना Video Viral

ते पुढे म्हणतात की 'मला असा विचार करायला हवा की माझ्याकडे माझी 'अल्लुरी सीता रामराजू' आहे, माझ्याकडे माझा 'कोमराम भीम' आहे, माझ्याकडे माझी 'सीता' आहे. मी माझ्या भूमिकांचे, पात्रांचा समतोल कसा साधू. त्यांची इमेज नाही तर या सर्व पात्रांसह मी माझ्या प्रेक्षकांना कसे प्रभावित करू शकेले असाच मला प्रश्न असायचा.

" isDesktop="true" id="642699" >

'मी त्या क्षेत्राला कधी भेट दिली तर मला एक यशस्वी कथाकार होण्याची संधी आहे. हा माझा दृष्टिकोन आहे. मी त्यांच्या प्रतिमांचा विचार करत नाही. तसेच ते पुढे म्हणाले की, त्यांची प्रतिमा प्रेक्षकांना थिएटरमध्ये आणते, परंतु माझी कथा प्रेक्षकांना पात्रांची अनुभूती देते." राजामौली यांचा आरआरआर 17 जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे. यामध्ये राम चरण, एनटीआर, अजय देवगण, श्रेया सरन आलिया भट्ट व्यतिरिक्त , अनेक परदेशी कलाकारही आहेत.

First published:
top videos

    Tags: Alia Bhatt, Bollywood News, Entertainment, Tollywood