रस्त्यावर कपडे विकणारा कपिल शर्मा झाला सुपरस्टार; गरीब तरुणाचा बॉलिवूडपर्यंतचा प्रवास

रस्त्यावर कपडे विकणारा कपिल शर्मा झाला सुपरस्टार; गरीब तरुणाचा बॉलिवूडपर्यंतचा प्रवास

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल एक काळ असाही होता, जेव्हा तो रस्त्यावर कपडे विकून आपलं गुजराण करत असे. पाहूया कपिल शर्मा कसा झाला सुपरस्टार?...

  • Share this:

मुंबई 2 एप्रिल: कपिल शर्मा (Kapil Sharma) हा देशातील सर्वाधिक लोकप्रिय विनोदवीरांपैकी एक म्हणून ओळखला जातो. आज कपिलचा वाढदिवस आहे. 40 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आपल्या अनोख्या अभिनयशैलीतून प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या कपिलकडे आज लाखोंचं फॅन फॉलोइंग आहे. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल एक काळ असाही होता, जेव्हा तो रस्त्यावर कपडे विकून आपलं गुजराण करत असे. पाहूया कपिल शर्मा कसा झाला सुपरस्टार?...

कपिलचा जन्म 1981 साली पंजाबमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्याचे वडिल पोलीस होते. पण तो लहान असतानाच कर्करोगामुळं त्याचं निधन झालं. परिणामी कुटुंबाची आर्थिक जबाबदारी कपिलवर आली. अन् त्यानं देखील मिळेल ते काम करुन ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. सुरुवातीला तो एक पिसीओ बूथवर बसायचा. तिथंच त्यानं कपड्यांचा एक ठेला देखील सुरु केला होता. त्यावेळी तो बॉलिवूड कलाकारांची मिमिक्री करुन आपलं हे लहानसं दुकान चालवत होता.

अवश्य पाहा - ‘थलैवी’साठी काहीही...; कंगना रणौत 24 तास उभी राहिली पाण्यात

दरम्यान कपिलनं द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या शोमध्ये भाग घेतला. लक्षवेधी बाब म्हणजे 2007 साली प्रदर्शित झालेल्या या शोचा तो विजेताही ठरला. अन् तेथून कपिलच्या करिअरला खऱ्या अर्थानं गती प्राप्त झाली. त्यानंतर सोनी वाहिनीनं त्याला कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो होस्ट करण्याची संधी दिली. कपिलच्या अनोख्या विनोदी शैलीमुळं हा शो सुपरहिट ठरला, व सोबतच कपिलदेखील सुपरस्टार झाला. त्यानंतर त्याला काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम करण्याची संधी मिळाली. अशा प्रकारे कधीकाळी रस्त्यावर कपडे विकणारा कपिल झाला सुपरस्टार विनोदवीर.

Published by: Mandar Gurav
First published: April 2, 2021, 9:08 AM IST

ताज्या बातम्या