सुश्मिता सेनला KISS करताना दिसला बॉयफ्रेंड रोहमन, Photo Viral

सुश्मिता सेनला KISS करताना दिसला बॉयफ्रेंड रोहमन, Photo Viral

सुश्मिता आणि रोहमनचा एक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 23 जुलै : बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन मागच्या काही दिवसांपासून तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. मॉडेल रोहमन शॉलला डेट करत असल्याचं सुश्मितानं सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केलं त्यानंतर या दोघांच्या नावाची चर्चा सर्वत्र होऊ लागली. या दोघांचे सोशल मीडियावरील फोटो सतत चर्चेत राहीले. असंच काहीसं आताही घडलं आहे. नुकताच सुश्मिता आणि रोहमनचा एक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात रोहमन सुश्मिताला किस करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला सुश्मिता रोहमनच हा फोटो रोहमननेच त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटमध्ये रोहमन सुश्मिताच्या गालावर किस करताना दिसत आहे. तर सुश्मिता सुद्धा गोड हसत आहे. हा फोटो एवढा क्यूट आहे की, सोशल मीडियावर सर्वच या फोटोचं कौतुक करताना दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना रोहमननं लिहिलं, ‘I just love her dimples My munchkin @sushmitasen47 I LOVE YOU’ त्यांच्या या फोटोला अनेकांनी लाइक केलं आहे.

लग्नानंतर महिन्याभराने या नवनिर्वाचित खासदाराने शेअर केला फोटो आणि....

View this post on Instagram

I just love her dimples ❤️ My munchkin ❤️ @sushmitasen47 I LOVE YOU #love #life #happiness #smile #mine

A post shared by rohman shawl (@rohmanshawl) on

या फोटोंपेक्षा वेगळं बोलायचं तर सुश्मिता सध्या बॉयफ्रेंड रोहमन आणि तिच्या दोन्ही मुलींसोबत सुट्टी एंजॉय करत आहे. या व्हेकेशनचे काही फोटो तिनंही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे. या फोटोला सुश्मितानं, 'माझ्यासोबत चल, सत्याचा उत्सव साजरा करू जे होईल ते होइल रोहमन शॉल खूप सारं प्रेम' असं कॅप्शन दिलं.

Sacred Games 2 : सैफ, नवाझ, कल्की यांचे 10 Exclusive रेट्रो लुक इथे पाहा

याशिवाय काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत सुश्मितानं, ती रोहमनला एक चाहता म्हणून सोशल मीडियावर भेटल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर रोहमननं तिला फुटबॉल मॅचसाठी बोलवलं आणि अशा रितीनं त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली होती.

Bigg Boss Marathi 2 : विणा आणि शिवच्या नात्यात येणार का दुरावा?

काही दिवसांपूर्वी रोहमनच्या एका पोस्टमुळे सोशल मीडियावर सुश्मिता आणि रोहमनच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण नंतर या दोघांनीही या सर्व अफवा असल्याचं सांगत या चर्चा फेटाळल्या. रोहमन शॉलनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून आपल्या भावनांना वाट करून दिली होती. इन्स्टाग्राम स्टोरीवर रोहमननं एका मागोमाग एक 4 पोस्ट केल्या, या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, ‘हे यू, मी तुझ्याशी बोलत आहे. असं काय आहे ज्याचा तुला त्रास होत आहे. कृपया मला सांग मी तुझं सर्वकाही मन लावून ऐकत आहे. 24 तास.’ अशाच एकमागोमाग एक भावूक पोस्ट त्यानं शेअर केल्या होत्या.

=====================================================================

दोन तरुणींमध्ये फ्री स्टाईलनं तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल

Published by: Megha Jethe
First published: July 23, 2019, 9:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading