Sacred Games 2 : ही आहे नव्या कॅरॅक्टर्सची ओळख, सैफ, नवाझ, कल्की यांचे 10 Exclusive रेट्रो लुक इथे पाहा

sacred games 2 मध्ये नवाझुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान यांच्या व्यतिरिक्त कल्की कोचलीन आणि रणवीर शोरी यांची नव्यानं एंट्री होत आहे. आता या अनोख्या रेट्रो फोटो शूटमधून त्यांच्या कॅरॅक्टर्सची ओळख करून देण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 22, 2019 06:39 PM IST

Sacred Games 2 : ही आहे नव्या कॅरॅक्टर्सची ओळख, सैफ, नवाझ, कल्की यांचे 10 Exclusive रेट्रो लुक इथे पाहा

वेब सीरिज सेक्रेड गेम्सच्या यशानंतर आता त्याच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. दुसऱ्या सीझनचं शूटिंग पूर्ण झालं असून हा सीझन 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. त्यापुर्वी या वेब सीरिजमधील सर्व कॅरॅक्टर्सची ओळख रेट्रो फोटो शूटमधून करून देण्यात आली...

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनं Sacred Games 2 मध्ये गणेश गायतोंडेची भूमिका साकरली आहे. मात्र या भागातील त्याचा लुक आणि राहणीमान पूर्ण पणे वेगळं दाखवण्यात आलं आहे. या सीझन मध्ये गणेश गायतोंडे परत येतोय आणि तेही नव्या अंदाजात...

अभिनेता सैफ अली खान मागच्या बऱ्याच काळापासून सिनेमांपासून दूर असला तर मागील वर्षी त्यान Sacred Games या वेब सीरिजमधून प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. आताच्या या सीझिन मध्येही सैफ पोलिस अधिकारी सरताज सिंगची भूमिका साकारणार आहे. ज्याला आपल्यावर संकट आलं हे माहित आहे मात्र शत्रू कोण हे माहितच नाही. अशा वेळी तो मुंबईला गणेश गायतोंडेच्या नव्या चालीपासून कसं वाचवणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Sacred Games 2 मधील आणखी एक महत्त्वाचं कॅरॅक्टर म्हणजे, गुरुजी. अभिनेता पंकज त्रिपाठी यानं या वेब सीरिजमध्ये गुरुजींची भूमिका साकारली आहे. आपल्या भूमिकेविषयी बोलताना पंकज म्हणतो, 'गुरुजी ही अशी त्सुनामी आहे, ज्याच्या प्रभावापासून वाचणं खूप कठीण आहे आणि त्याच्या हालचाली समजून घ्यायच्या असतील तर संपूर्ण सीझन तुम्हाला दोन वेळा पाहवा लागेल.'

Sacred Games 2 मध्ये अभिनेत्री कल्की कोचलिनची नव्यानं एंट्री झाली आहे. ती या वेब सीरिजमध्ये 'बत्या'ची भूमिका साकारत आहे. मात्र तिच्या भूमिकेबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. त्यामुळे तिचं सत्य जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना सीझन रिलीज होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Loading...

अभिनेत्री सुवरिन चावलानं Sacred Games मध्ये जोजोची भूमिका साकारली होती. मात्र पहिल्या सीझनमध्ये तिची खरी ओळख पूर्णपणे गुदस्त्यात होती. मात्र या सीझनमध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. ती गायतोंडेची मैत्रिण असून ती कोणालाच न घाबरणारी आणि बिनधास्त आहे.

Sacred Games 2 मध्ये अभिनेता रणवीर शोरी याची देखिल नव्यानं एंट्री झाली आहे. मात्र अद्याप त्याच्या भूमिकेचं नाव समजलेलं नाही. रणवीरनं जेव्हा पहिला सीझन पाहिला होता त्यावेळी दुसऱ्या सीझनमध्ये आपण असणार आहोत याची त्याला कल्पनाही नव्हती. रणवीरची नव्यानं एंट्री झाल्यानं आता त्याच्या भूमिकेविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

बंटी इज बॅक! Sacred Games मध्ये दिसलेला बंटी म्हणजे अभिनेता जतिन सरना या सीझनमध्येही गणेश गायतोंडेचा 'सच्चा साथी' म्हणून पाहायला मिळणार आहे. पण मागच्या सीझन पेक्षा या सीझनमध्ये त्याची भूमिका थोडीशी वेगळी आणि हटके असणार आहे.

अभिनेता ल्यूक केनी Sacred Games मध्ये 'मॉल्कम'च्या भूमिकेत दिसला होता. या सीझनमध्येही तो या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मुंबईतील मोठ-मोठे प्लान बनवण्यासाठी मॉल्कम एक गुप्त ऑपरेटर म्हणून काम करतो. तो गुरुजींच्या जवळची व्यक्ती आहे. गुरुजींना जे काही सांगायचं असतं ते मॉल्कमच्या मार्फत सर्वांपर्यंत पोहोचवलं जातं.

काही दिवसांपूर्वी Sacred Games 2 चा ट्रेलर रिलीज झाला असून याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मागच्या बऱ्याच काळापासून प्रेक्षकांच्या मनात या वेब सीरिजच्या दुसऱ्या भागाविषयी खूप उत्सुकता होती. अखेर हा सीझन 15ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

काही दिवसांपीूर्वी या सीझनमधील आपला लुक शेअर करताना नवाजुद्दीननं, 'पिछली बार क्या बोला था गणेश भाई को ? औकात...' असं कॅप्शन त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टला दिलं होतं. त्यामुळे यावेळी या सीझनमध्ये मोठा धमाका होणार हे निश्चित. अशातच गायतोंडेनं सरताजचं आयुष्य उद्धवस्त करून टाकण्याची धमकीही दिली आहे.

सेक्रेड गेम्स सीझन 2 मध्ये नवाझुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान यांच्या व्यतिरिक्त कल्की कोचलीन आणि रणवीर शोरी यांची नव्यानं एंट्री होत आहे. यातील नवाजुद्दीनच्या सीन्सचं दिग्दर्शन अनुराग कश्यपनं तर सैफ अली खान उर्फ सरताज सिंहच्या सीन्सचं दिग्दर्शन नीरज घायवान यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 22, 2019 06:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...