लॉकडाऊनमध्ये सनी लिओनी करतेय एरोबिक्स, हॉट रेट्रो लूकमधील VIDEO व्हायरल

लॉकडाऊनमध्ये सनी लिओनी करतेय एरोबिक्स, हॉट रेट्रो लूकमधील VIDEO व्हायरल

अभिनेत्री सनी लिओनी देखील लॉकडाऊन सुरू झाल्यापासून विविध व्हिडीओ आणि फोटो शेअर करत आहे. नुकताच तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती एरोबिक्स करताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 22 एप्रिल : कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे चित्रपट सृष्टीतील अनेक काम ठप्प आहेत. परिणामी सर्व कलाकार आपापलं मनोरंजन करण्यासाठी, वेळ घालवण्यासाठी विविध व्हिडीओ पोस्ट करत आहेत. अभिनेत्री सनी लिओनी देखील लॉकडाऊन सुरू झाल्यापासून विविध व्हिडीओ आणि फोटो शेअर करत आहे. नुकताच तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती एरोबिक्स करताना दिसत आहे. यासाठी तिने थीम रेट्रो वापरली आहे. त्यामुळे एकदम 80 व्या दशकातील फॅशन करत सनीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

दरम्यान या रेट्रो एरोबिक्सचा पूर्ण व्हिडीओ पोस्ट करण्याआधी सनीने त्याची छोटीशी झलक पोस्ट केली होती.  'थोडीशी मस्ती प्लॅन केली आहे. लवकरच व्हिडीओ येईल', असं कॅप्शन देत तिने तिच्या फन व्हिडीओचा टीझर शेअर केला होता.

View this post on Instagram

 

Hmmm...something fun planned!! Video to come!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

त्यानंतर सनीने एक खरोखरच खूप एन्जॉय करताना एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती तिची वहिनी करिश्म वोहरा बरोबर रेट्रो एरोबिक्स करताना दिसत आहे. लॉकडाऊनमुळे दोघी एकाठिकाणी नसल्या तरी, एडिटिंगची कमाल वापरत त्यांनी हा व्हिडीओ बनवला आहे.

सनी लिओनीच्या या व्हिडीओवर देखील तिच्या चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. तर आतापर्यंत 20 लाखांपेक्षा जास्त वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे.

First published: April 22, 2020, 10:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading