जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / कधी काळी 35 रुपये कमवायचा, आज करोडोंत खेळतोय, वाचा Rohit Shetty ची इंटरेस्टिंग लाईफ स्टोरी

कधी काळी 35 रुपये कमवायचा, आज करोडोंत खेळतोय, वाचा Rohit Shetty ची इंटरेस्टिंग लाईफ स्टोरी

Rohit Shetty Birthday Special

Rohit Shetty Birthday Special

बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकांच्या यादीत अनेक दिग्गजांचा समावेश होतो. यामध्ये रोहित शेट्टी(Rohit Shetty ) हे नाव अग्रक्रमाने घेतले जाईल. त्याचे अॅक्शन आणि मसाला चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडतात. रोहित शेट्टी हा बॉलिवूड कलाकारांचा लाडका दिग्दर्शक आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 14 मार्च: बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकांच्या यादीत अनेक दिग्गजांचा समावेश होतो. यामध्ये रोहित शेट्टी(Rohit Shetty ) हे नाव अग्रक्रमाने घेतले जाईल. त्याचे अॅक्शन आणि मसाला चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडतात. रोहित शेट्टी हा बॉलिवूड कलाकारांचा लाडका दिग्दर्शक आहे. यशाच्या शिखरावर असणारा रोहित कधी काळी 35 रुपये कमवायचा. मात्र, आज करोडोंत खेळतोय. रोहित शेट्टीचा जन्म 14 मार्च 1973 रोजी मुंबईत झाला. त्याच्या कुटुंबाचे कनेक्शन बॉलीवुडशी आहे. त्यांचे वडील एमबी शेट्टी हे चित्रपट उद्योगातील अॅक्शन कोरिओग्राफर, स्टंटमॅन आणि अभिनेते होते. रोहित शेट्टीची आई मधू शेट्टीही मनोरंजन विश्वात सक्रिय होती. ती ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करायची. रोहितला दोन भाऊ आहेत, त्यांची नावे उदय आणि हृदय शेट्टी आहेत. रोहितने मुंबईतील सेंट मेरी स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले. रोहितने 14 व्या वर्षीच दिग्दर्शक होण्याचा निर्णय घेतला होता. आणि आता तो बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकांच्या यादीत त्याचा समावेश आहे. एका मुलाखतीत त्याने, आपल्या संघर्षाच्या दिवसांची आठवण करून देत जेव्हा त्याने काम करायला सुरुवात केली तेव्हा त्याला 35 रुपये पगार मिळायचा. चित्रपटाच्या सेटवर जाण्यासाठी पैसे नसतील तर तो पायी चालत जायचे, त्यासाठी दीड ते दोन तास लागायचे. त्याचा प्रवास सोपा नव्हता. तो म्हणाला, ‘लोकांना वाटते की मी चित्रपटसृष्टीतून आलो आहे, त्यामुळे माझ्यासाठी हे सोपे असेल, पण तसे नाही. बर्‍याच वेळा असे व्हायचे की मला जेवण आणि प्रवास यापैकी एक निवडावा लागला, कारण माझ्या खिशात फक्त एका गोष्टीसाठी पैसे असायचे. आम्ही सांताक्रूझमध्ये राहायचो. यानंतर आम्ही दहिसर येथील माझ्या आजीच्या घरी शिफ्ट झालो. आमच्याकडे राहायला घरही नव्हते. मी आर्थिकदृष्ट्या खूप अडचणीत होतो. दूर असलेल्या दहिसरला माझी आजी राहत होती. मग मी चालायचा यायला लागलो. मी मालाड ते अंधेरीला चालत जायचो. मला दीड ते दोन तास लागायचे. मला अनेक मार्ग माहित आहेत. जेव्हा मी माझ्या ड्रायव्हरला हा मार्ग फॉलो करायला सांगतो तेव्हा तो रिव्ह्यू मिररमध्ये माझ्याकडे पाहतो आणि विचार करतो की मला सर्व मार्ग कसे माहित आहेत? पण त्यामागे स्ट्रगल आहे. 2003 साली रोहित शेट्टीने अजय देवगणसोबत ‘जमीन’ हा चित्रपट बनवला, जो बॉक्स ऑफिसवर सरासरी ठरला. त्यानंतर 2006 मध्ये ‘गोलमाल’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले. हा विनोदी चित्रपट हिट ठरला. यानंतर रोहित शेट्टीने मागे वळून पाहिले नाही आणि एकापाठोपाठ एक यशस्वी चित्रपट दिग्दर्शित केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात