मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सुशांतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्तीने पहिल्यांदाच शेअर केला दोघांचा हा फोटो

सुशांतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्तीने पहिल्यांदाच शेअर केला दोघांचा हा फोटो

सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीने (riya chakraborty) पहिल्यांदाच आपला प्रोफाईल फोटो बदलला आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीने (riya chakraborty) पहिल्यांदाच आपला प्रोफाईल फोटो बदलला आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीने (riya chakraborty) पहिल्यांदाच आपला प्रोफाईल फोटो बदलला आहे.

मुंबई, 13 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं (sushant singh rajput) अभिनेत्री अंकिता लोखंडेसह ब्रेकअप झाल्यानंतर सुशांतचं नाव जोडलं गेलं ते अभिनेत्री रिया चक्रवर्तीशी (riya chakraborty). सुशांत आणि रियाचे एकत्र असे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरम्यान आता रिया चक्रवर्तीने सुशांतच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच सुशांत आणि आपला फोटो शेअर केला आहे.

रियाने आपला व्हॉट्सअॅप प्रोफाईल फोटो बदलला आहे. ज्यामध्ये तिनं आपला आणि सुशांतचा फोटो ठेवला आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. ते दोघंही काही दिवसांपासूनरिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात होतं. मात्र या दोघांनी याबद्दल कधीच कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. दरम्यान पोलीस चौकशीत रियाने आपण रिलेशिपमध्ये होतो असं सांगितलं होतं.

हे वाचा -  करण जोहरचं सोशल मीडियावर प्रायव्हेट अकाऊंट? सेलिब्रिटी करतायेत फॉलो

सुशांतच्या सुप्रसिद्ध शुद्ध देशी रोमांस आणि रियाच्या मेरे डॅडी की मारुती या चित्रपटाच्या शूटिंगचे सेट जवळपास होते. तिथेच आपली पहिली भेट झाली आणि त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या फिल्म सेटवर आणि पार्टीत भेटत राहिलो. असं रियाने सांगितलं. आम्ही मित्र झालो आणि आम्ही एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले, भेटतही होतो पण त्यावेळी सुशांत आधीच रिलेशनशिपमध्ये होता, असं रियाने पोलीस चौकशीत सांगितलं. त्यानंतर आम्ही एकाच प्रॉडक्शन हाऊसपासून वेगळे होऊन स्वतंत्र होण्यासाठी आणि वेगवेगळ्या बॅनरखाली काम करण्याचा निर्णयही घेतला आणि दोघंही रिलेशिपमध्ये आलो, असं रिया म्हणाली.

हे वाचा - 'दिल बेचारा'तील अभिनेत्रीसह रोमँटिक डान्स; सुशांत सिंह राजपूतचा Unseen Video

सुशांतने आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही स्पष्ट नाही. मात्र त्याच्या आत्महत्येमागे अनेक कारणे असल्याचे बोलले जात असून त्यानुसार मुंबई पोलिसांनी सुशांतशी संबंधित अनेकांची चौकशी केली सुरू केली आहे. त्यामध्ये रिया चक्रवर्तीचाही जबाब घेण्यात आला. गुरुवारी 18 जूनला सकाळी 11 वाजता रिया चक्रवर्ती बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करता हजर झाली आणि बांद्रा पोलिसांनी रियाची कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान रियाने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

First published:
top videos

    Tags: Sushant Singh Rajput