मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सुशांतच्या आत्महत्येनंतर करण जोहरचं सोशल मीडियावर प्रायव्हेट अकाऊंट? सेलिब्रिटी करतायेत फॉलो

सुशांतच्या आत्महत्येनंतर करण जोहरचं सोशल मीडियावर प्रायव्हेट अकाऊंट? सेलिब्रिटी करतायेत फॉलो

सुशांतच्या आत्महत्येनंतर करण जोहरने (karan johar) आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली, त्यानंतर तो व्हेरिफाइड अकाऊंटवर सक्रिय नाही.

सुशांतच्या आत्महत्येनंतर करण जोहरने (karan johar) आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली, त्यानंतर तो व्हेरिफाइड अकाऊंटवर सक्रिय नाही.

सुशांतच्या आत्महत्येनंतर करण जोहरने (karan johar) आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली, त्यानंतर तो व्हेरिफाइड अकाऊंटवर सक्रिय नाही.

मुंबई, 13 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील नेपोटिझमचा वाद सुरू झाला. दिग्दर्शक करण जोहरसह (Karan Johar) अनेक बॉलीवूड कलाकार विशेषत: स्टार किड्सना लक्ष्य केलं जाऊ लागलं. यानंतर काही कलाकारांनी आपले सोशल मीडिया अकाऊंट डिलीट केलं तर काहींनी प्रायव्हेट केले. दरम्यान करण जोहरदेखील आपल्या वेरिफाइड अकाऊंटवर सक्रिय नाही. त्याने आता सिक्रेट प्रायव्हेट अकाऊंट तयार केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, करण जोहरने karanafffairs या नावाने सोशल मीडियावर सिक्रेट प्रायव्हेट अकाऊंट तयार केलं आहे.

हे अकाऊंट वेरिफाइड नाही, मात्र तरी अनेक सेलिब्रिटी हे अकाऊंट फॉलो करत आहेत. यामध्ये शाहरूख खानची पत्नी गौरी आणि मुलगी सुहाना, अमिताभ बच्चनची मुलगी श्वेता आणि अभिनेत्री अनन्या पांडेचाही समावेश आहे. या सेलिब्रिटींनी करण जोहरच्या या अकाऊंटला फॉलो केल्यानं करणने फिल्म इंडस्ट्रीतील आपले मित्रमैत्रिणी आणि खास व्यक्तींसाठी प्राइव्हेट अकाऊंट बनवलं असं मानलं जातं आहे.

हे वाचा - 'दिल बेचारा'तील अभिनेत्रीसह रोमँटिक डान्स; सुशांत सिंह राजपूतचा Unseen Video

सुशांतच्या निधनानंतर करणने सोशल मीडियावर त्याच्याबाबत एक पोस्ट शेअर केली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर आपल्याला खूप मोठा धक्का बसला आहे. आपण जी चूक केली ती पुन्हा करणार नाही, असं करण जोहर म्हणाला होता. करणच्या या पोस्टनंतर सुशांतच्या चाहत्यांनी त्याला ट्रोल केलं. सोशल मीडियावर कायम सक्रिय राहणाऱ्या करणने त्यानंतर कोणतीच पोस्ट शेअर केली नाही. त्यानंंतर त्याचे फॉलोअर्स कमी झाल्याचे देखील काही मीडिया अहवालांनी सांगितले आहे. बॉलिवूड हंगामाच्या एका अहवालानुसार करणच्या एका खास मित्राने त्याच्या परिस्थितीचा खुलासा केला आहे.

हे वाचा - सुशांतच्या आत्महत्येनंतर ट्रोलिंगमुळे पूर्णपणे खचला करण जोहर, रडूही कोसळलं; जवळच्या मित्राचा खुलासा

"करण पूर्णपणे कोलमडला आहे. ट्रोल्सबद्दल बोलायचे झाले तर याआधी तो कधी या गोष्टींमुळे प्रभावित झाला नव्हता, जितका सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर झाला आहे. सुशांतच्या आत्महत्येने करण पुरता हादरून गेला होता, त्यानंतर त्याला ट्रोल केल्यामुळे तर तो पूर्णपणे खचला देखील होता, तो रडत होताच. सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगचा त्याच्यावर खूप वाईट परिणाम झाला आहे", असं त्याने सांगितलं.

First published:
top videos

    Tags: Karan Johar, Sushant Singh Rajput