स्वस्तिकाने हा व्हिडीओ शेअर करताना पोस्टमध्ये म्हटलं, "त्याने किजीसह डान्स केला आणि त्यानंतर माझ्यासोबतदेखील डान्स केला. मला सुशांत नेहमी असाच आठवणीत राहिल. साधा, प्रेमळ, हसमुख. ताऱ्यांसहदेखील असाच नाच. मुकेश छाबरा या सुंदर क्षणांना कॅमेऱ्यात कैद केल्याने आभार, मी ही आठवण जपून ठेवेन" हे वाचा - या 2 भयावह मानसिक आजारांनी सुशांतला ग्रासलं होतं; 7 दिवस होता रुग्णालयात सुशांतचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा डिज्नी हॉट स्टार प्लसवर 24 जुलैला रिलीज होणार आहे. यामध्ये संजना कॉलेज तरुणीच्या भूमिकेत आहे, जी कॅन्सरशी लढा देत असते. तिची भेट मॅनी म्हणजे सुशांतसह होते आणि मग त्यांचा प्रवास सुरू होतो. स्वस्तिका संजना सांघीच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी स्वस्तिका सुशांतसह 2015 साली 'ब्योमकेश बक्शी'मध्ये दिसली होती. हे वाचा - बॉलिवूडला धक्का! कॅन्सरशी लढा हरली अभिनेत्री; मृत्यूपूर्वी केली भावुक पोस्ट सुशांत सिंह राजपूतने 14 जूनला आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sushant Singh Rajput