• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'Bigg Boss OTT'चं झालं पहिलं एलिमिनेशन, पाहा 'संडे का वार' मध्ये कोण गेलं घराबाहेर

'Bigg Boss OTT'चं झालं पहिलं एलिमिनेशन, पाहा 'संडे का वार' मध्ये कोण गेलं घराबाहेर

टीवीवरील सर्वात प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT)’ तील पहिलं एलिमिनेशन झालं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : टीवीवरील सर्वात प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT)’ तील पहिलं एलिमिनेशन झालं आहे. आज शो ‘संडे का वार’ मधील उर्फी जावेद घरातून बाहेर पडली आहे. शोच्या पहिल्या एलिमिशेनमध्ये एकूण 3 स्पर्धाकांच्या नाव सामील होतं. ज्यात उर्फी जावेद, राकेश बापत आणि शमिता शेट्टी यांच्या नावाचा समावेश होता. उर्फी घरी बाहेर गेल्यानंतर आता राकेश आणि शमिता सुरक्षित झाले आहेत. 'संडे का वार'च्या सुरुवातीला, शोचा होस्ट करण जोहरने दिव्या अग्रवालचा क्लास घेतला आणि तिला सांगितले की, ती तिच्या स्वत: च्या इच्छेनुसार शोमध्ये आली आहे. म्हणून तिला जबरदस्तीने इथे आणण्यात आले आहे, असे म्हणणे थांबवा. यानंतर, करणने प्रतिकलाही विचारले की, असं काय झाले की अचानक त्याची वागणूक शोमध्ये बदलली. तो कोणत्या प्लानसह शोमध्ये आला का? यावर प्रतीक म्हणाला की मी असाच आहे. (The first elimination of Bigg Boss OTT who went out of the house in Sunday Ka War) हे ही वाचा-ना मेहंदी, ना संगीत! साध्या पद्धतीनं पार पडलं अनिल कपूरच्या मुलीचं लग्न
  View this post on Instagram

  A post shared by Voot Select (@vootselect)

  मात्र, करण जोहरने आज प्रतिकचं कौतुक केलं. त्याचबरोबर आजच्या शोमध्ये करणने शमितासमोर राकेशची पोल खोल केली. त्यानंतर राकेश आज संपूर्ण शोमध्ये काहीही बोलण्याच्या स्थितीत नव्हता. कारण करणच्या पोलनंतर स्मितानेही करणला बरेच काही सांगितले. वास्तविक, करणने सर्वांसमोर राकेश हा दिव्याशी शमिताबद्दल काय बोलत होता ते सांगितले.
  Published by:Meenal Gangurde
  First published: