कोणत्या कॅन्सरशी झुंज देत होते ऋषी कपूर? निधनानंतर पहिल्यांदाच खुलासा

कोणत्या कॅन्सरशी झुंज देत होते ऋषी कपूर? निधनानंतर पहिल्यांदाच खुलासा

ऋषी कपूर (Rishi Kapoor) क्रोनिक लिफ्टोसाइटिक ल्युकेमिया (leukemia) झाला होता, अशी माहिती त्यांच्या कुटुंबानं दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 30 एप्रिल : अभिनेते ऋषी कपूर (Rishi kapoor) यांनी मुंबईतल्या एचएन रिलायन्स रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. सुरुवातीला ते गंभीर आजाराने ग्रस्त होते असं सांगितलं जायचं. त्यानंतर ऋषी कपूर यांनी आपल्याला कॅन्सर (cancer) झाल्याचं सांगितलं होतं, तर आता त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबानं त्यांना कोणता कॅन्सर झाला होता, त्याचा खुलासा केला.

ऋषी कपूर यांना ल्युकेमिया (leukemia) झाला होता. 2018 साल ऋषी कपूर यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू होते, तेव्हा त्यांना गंभीर आजार झाला आहे, इतकंच समजलं होतं.  सप्टेंबर 2019 मध्ये ते भारतात परतले. न्यूयॉर्कमध्ये 8 महिने उपचार झाल्यानंतर 2019 मध्ये ऋषी कपूर यांनी आपल्याला कॅन्सर असल्याचं सांगितलं. मात्र कोणता कॅन्सर झाला हे सांगितलं नव्हतं.

हे वाचा - इरफान खाननं ऋषी कपूर यांच्याबद्दल सांगितली होती ही खास गोष्टी, वाचून व्हाल भावुक

यावर्षीही फेब्रुवारीमध्ये ते वारंवार आजारी पडत होते. त्यांचा कॅन्सर रिप्लेस झाल्याचीही चर्चा होती.  रुग्णालयाच्या माहितीनुसार कॅन्सरसंबंधित समस्यांमुळेच त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.  ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांना कोणता कॅन्सर झाला होता, हे त्यांच्या कुटुंबानं सांगितलं आहे. ऋषी कपूर यांच्या कुटुंबानं सांगितलं की, ऋषी कपूर गेल्या 2 वर्षांपासून ल्युकेमियाशी लढत होते. आता त्यांना कॅन्सर शेवटच्या टप्प्यात होता, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

काय आहे ल्युकेमिया?

तज्ज्ञांच्या मते, ल्युकेमिया एक ब्लड कॅन्सर आहे, ज्याला क्रोनिक लिम्फोसाइटिक ल्यूकेमिया (CLL) म्हटलं जातं. हा कॅन्सर प्रामुख्याने रक्त आणि बोनमॅरोला प्रभावित करतो. यामध्ये शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींचं प्रमाण असामान्य रूपानं वाढतं, त्यानंतर त्यांचा आकारही बदलतो. ल्युकेमियामुळे निरोगी नसलेल्या पेशी वाढतात आणि रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होऊ लागते. यामुळे रुग्ण इन्फेक्शन आणि तापाच्या विळख्यात लवकर सापडतो. रुग्णाची त्वचाही पिवळसर पडू लागते.

हे वाचा - शेवटच्या क्षणी ऋषी कपूर करत होते 'हे' काम, डॉक्टरांनीही केलं कौतुक

सुरुवातीच्या टप्प्यात यावर उपचार होत नाहीत. कॅन्सर वाढू लागतो, लक्षणं दिसू लागतात तेव्हाच त्याच्यावर उपचार सुरू होतात. केमोथेरेपीनंतर सामान्यपणे हा आजार बरा होत नाही.  हा एक असा आजार आहे, जो पुन्हा पुन्हा येण्याची शक्यता असते. त्यामुळे बोनमॅरो ट्रान्सप्लांट करून रुग्णाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: April 30, 2020, 1:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading