जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'तुम्ही आमच्यासाठी देवदूत...' नीतू कपूर यांनी अंबानींचे या शब्दांत मानले आभार; नेमकं काय घडलं होतं?

'तुम्ही आमच्यासाठी देवदूत...' नीतू कपूर यांनी अंबानींचे या शब्दांत मानले आभार; नेमकं काय घडलं होतं?

'तुम्ही आमच्यासाठी देवदूत...' नीतू कपूर यांनी अंबानींचे या शब्दांत मानले आभार; नेमकं काय घडलं होतं?

नीतू सिंह यांनी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्यासोबचा एक फोटो शेअर त्यांचे आभार मानले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 5 मे : बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी नीतू कपूर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही दिवसांपूर्वी नीतू कपूर यांनी प्रेअर मीट ठेवली होती. त्यानंतर आता नीतू सिंह यांनी त्या सर्वांचे आभार मानले आहेत. ज्यांनी या कठीण काळात त्यांची साथ दिली. सोशल मीडियावर एक भलीमोठी पोस्ट लिहित नीतू यांनी सर्वांना धन्यवाद दिले आहेत. या पोस्टसोबत त्यांनी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. नीतू सिंह यांनी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्यासोबचा एक फोटो शेअर करताना लिहिलं, ‘एक कुटुंब म्हणून मागची दोन वर्षं आमच्यासाठी मोठ्या प्रवासासारखी राहिली आहेत. यात काही चांगले दिवस होते तर काही वाईट. कदाचित हे सर्व दिवस काजळीचे होते असं म्हणणं योग्य ठरेल. पण हा प्रवास अंबानी कुटुंबाचं अतुलनीय प्रेम आणि पाठिंब्याशिवाय अशक्य होता.’

जाहिरात

त्यांनी पुढे लिहिलं, मागच्या काही दिवसांनंतर धाडस गोळा करुन मी माझे भावना शब्दात बांधण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामधून मी माझ्या कुटुंबाला सर्वांनी केलेल्या मदतीबद्दल आणि आमची काळजी घेतल्याबद्दल आभार मानू शकेन. मागच्या 7 महिन्यात या कुटुंबानं या गोष्टीची पूर्ण काळजी घेतली की ऋषी यांनी कमीत कमी वेदना होतील. हॉस्पिटलमध्ये त्यांची देखभाल होत आहे की नाही यापासून ते स्वतः हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांची विचारपूस करणे, जेव्हा आम्हाला भीती वाटली त्यावेळी आम्हाला देईपर्यंत ते आमच्यासोबत राहिले. नीतू कपूर यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये अंबानी कुटुंबीयांची नावं सुद्धा लिहिली आहेत. त्यांनी लिहिलं, आमच्या या कठिण प्रवासात तुम्ही नेहमीच आमची साथ दिली. देवदूत बनून तुम्ही आमच्या प्रवासात आमच्या सोबत राहिलात. आम्हाला तुमच्याबद्दल जे वाटतं ते शब्दात मांडणं कठीण आहे. तुमचा पाठिंबा, प्रेम आणि काळजी या सर्वच गोष्टींसाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. पाणीपुरी कशी खायची? विकी कौशल देतोय धडे, VIDEO पाहून आवरणार नाही हसू या ठिकाणी झालं होतं नीतू-ऋषी कपूर यांचं लग्न, 40 वर्षांनी समोर आला UNSEEN PHOTO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात