जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Kantara: ऋषभ शेट्टीच्या कांतारानं KGFला टाकलं मागे; बनला दुसरा सर्वात मोठा कन्नड सिनेमा

Kantara: ऋषभ शेट्टीच्या कांतारानं KGFला टाकलं मागे; बनला दुसरा सर्वात मोठा कन्नड सिनेमा

कांतारा

कांतारा

कन्नड सिनेमा कांतारा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. KGF2नंतर कांतारा कन्नडमधील दुसरा मोठा सिनेमा ठरला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 ऑक्टोबर : ऋषभ शेट्टीचा कांतारा हा सिनेमा दिवसेंदिवस आपला नवा रेकॉर्ड तयार करत आहे.  मुळ कन्नड भाषेत असलेल्या कांतारा या सिनेमानं सर्व भाषेतील प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. कोणतंही मोठं प्रमोशन न करता सिनेमा आज प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. काही दिवसांपूर्वीच सिनेमा प्रेक्षकांच्या आग्रहाखातर हिंदीमध्ये डब करून प्रदर्शित करण्यात आला. कांतारा या सिनेमानं KGF 1 आणि KGFचॅप्टर 2 ला मागे टाकत काही दिवसात तगडी कामाई तर केलीच पण त्याचबरोबर सर्वात मोठा कन्नड सिनेमा म्हणून बहुमान देखील कांतारा सिनेमाला मिळाला आहे. दिवाळीच्या विकेंडला सिनेमाचं कलेक्शन आणखी वाढलं असून आतापर्यंत सिनेमाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 170 करोड रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. पिंकविलानं दिलेल्या माहितीनुसार, कांतारा सिनेमा रिलीज होऊन चार आठवडे पूर्ण होतील या दिवसात कांतारा 200 करोड रुपयांची कमाई पूर्ण करेल असा विश्वास आहे. कांतारानं कर्नाटकमध्ये आतापर्यंत 111 करोड रुपयांची कमाई केली आहे. केजीएफपेक्षा ही कमाई दुप्पट आहे. अभिनेता यशच्या केजीएफ 2 ने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत कन्नड भाषेतील नंबर वन सिनेमा ठरला होता. हेही वाचा - Kantara Box Office : KGF2 ला टक्कर देणार ‘कांतारा’? वर्ल्डवाइड कलेक्शनची होतेय चर्चा

कांतारा हा सिनेमा मुळ कन्नड भाषेत आहे. कन्नड भाषेत हा सिनेमा काही दिवसातच इतका प्रसिद्ध झाला ज्याच्यामुळे काही दिवसातच म्हणजेच 14 ऑक्टोबरला सिनेमा हिंदी भाषेत रिलीज करण्यात आला. त्यानंतर तेलुगुमध्ये 15 ऑक्टोबर तर मल्याळम भाषेत 20 ऑक्टोबरला रिलीज करण्यात आला. हिंदी भाषेत सिनेमात प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. सिनेमा हाऊफुल्ल नसला तरी प्रेक्षकांना सिनेमा आवडल्याची पावती सोशल मीडियावर पाहायला मिळतेय. सिनेमाची सुरूवात आणि शेवट प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे. सिनेमात मिथकों, किंवदंतियो आणि अंधविश्वास यांची कहाणी दाखवण्यात आली आहे. सिनेमा ज्या प्रकारे प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला आहे तो प्रेक्षकांसाठी अत्यंत रोमांचित करणारा आहे. पवित्र रिती रिवाज आणि परंपरांच्या मागे लपलेल्या गोष्टी आणि रहस्यांचा उलगडा करणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात