मुंबई, 18 जानेवारी- सैराट गर्ल रिंकू (Rinku Rajguru) राजगुरू सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. रिंकू तिचे वर्कआऊट असेल किंवा कामाबद्दल माहिती सोशल मीडिया पोस्टमधून देत असते. ती तिचे विविध व्हिडिओ व फोटो शेअर करत नेहमीच चाहत्यांचे लक्षवेधून घेत असते. रिंकूने नुकतीच तिच्या इन्स्टा स्टोरीला आई वडिलांचा फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. रिंकूच्या आई वडिलांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त तिनं इन्स्टा स्टोरीला आई वडिलांचे काही खास फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. जगातील सर्वात बेस्ट आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवासाच्या शुभेच्छा, अशा शब्दात रिंकून आई वडिलांसाठी प्रेम व्यक्त केलं आहे. रिंकूचे आई वडील शिक्षक आहेत. तिच्या करिअरमध्ये या दोघांचा मोठा रोल आहे. वाचा- ‘पुष्पा’ स्टार अल्लू अर्जुनची पत्नी सुंदरतेत बालिवूड अभिनेत्रींना देते मात! रिंकू राजगुरूचा जन्म सोलापूरमधील अकलुज याठिकाणी झाला आहे. तिचं खरं नाव प्रेरणा महादेव राजगुरु असं आहे. परंतु तिला रिंकूच म्हटलं जातं. रिंकूने नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटातून मनोरंजन सृष्टीत पाऊल ठेवलं होतं. आपल्याच पहिल्याच चित्रपटाने तिला सुपरस्टार बनवलं होतं. मनोरंजन सृष्टीशी निगडित कोणतीही पार्श्वभूमी नसताना नागराज मंजुळे यांनी रिंकूची निवड केली. आणि तिने आपलं कौशल्य पणाला लावलं. या चित्रपटासाठी रिंकूला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘सैराट’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. देशातच नव्हे तर परदेशात सुद्धा या चित्रपटाची धूम होती. या चित्रपटाचे हिंदी आणि तेलगूमध्येही रिमेक झाले आहेत.यांनतर रिंकूने अनेक चित्रपट आणि वेबसीरीज केल्या आहेत. फारच कमी वयात तिने आपली खास ओळख निर्माण केली आहे.
सध्या रिंकू आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देत आहे. अभिनेत्रीने फारच कमी काळात स्वतःमध्ये मोठा बदल केला आहे. रिंकूचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वच थक्क होतात. ती आधीपेक्षा जास्त स्लिम आणि फिट झाली आहे. रिंकू सध्या विविध प्रोजेक्टसमध्ये व्यग्र आहे.