जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Rinku Rajguru: रिंकू राजगुरूला बाप्पाच्या आगमनाची ओढ; रॉयल लुकमध्ये करणार गणरायाचं स्वागत

Rinku Rajguru: रिंकू राजगुरूला बाप्पाच्या आगमनाची ओढ; रॉयल लुकमध्ये करणार गणरायाचं स्वागत

Rinku Rajguru: रिंकू राजगुरूला बाप्पाच्या आगमनाची ओढ; रॉयल लुकमध्ये करणार गणरायाचं स्वागत

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशात गणरायाच्या आगमनाची आतुरता सर्वांनाच लागली आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरुनेही बाप्पांच्या आगमनाची ओढ दाखवली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 ऑगस्ट : गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा झालेला नाही. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव सर्वांसाठी खास असणार आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशात गणरायाच्या आगमनाची आतुरता सर्वांनाच लागली आहे. अनेकांची मुर्ती बनवून तयार तर काहींनी फोटो आणि व्हिडीओही शेअर करायला सुरुवात केली आहे. एकंदरीत सगळेच बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागले आहेत. अशातच अभिनेत्री रिंकू राजगुरुनेही बाप्पांच्या आगमनाची ओढ दाखवली आहे. रिंकू राजगुरुने तिच्या इन्स्टाग्रामवर एक छोटासा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिनं बाप्पांच्या आगमनासाठी केलेल्या जय्यत तयारीची झलक दाखवली आहे. ढोल ताशा, पारंपारिक लुक, अशी काहीशी झलक रिंकूनं शेअर केली आहे. व्हिडीओच्या शेवटी लिहिलं की, ‘लवकरच’. त्यामुळे रिंकू लवकरच काहीतरी भन्नाट असं चाहत्यांसोबत शेअर करणार हे मात्र नक्की. तिचा हा काहीच सेकंदाचा व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधत असून व्हिडीओची उत्सुकताही वाढवत असल्याचं दिसतंय.

जाहिरात

बाप्पाच्या स्वागतासाठी भक्त सज्ज झाले आहेत. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात असून खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. जनसामान्यांपासून विविध क्षेत्रातील लोकांपर्यंत सगळेच उत्सुक असून सगळीकडे आनंदाचं वातावरण पहायला मिळत आहे. हेही वाचा -  Prajakta Mali: साडीवर बेल्ट लावायची गरजच काय? तुमच्या लाडक्या प्राजक्ताला पडलाय प्रश्न दरम्यान, ‘सैराट’ चित्रपटामुळे घराघरात पोहचलेली आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru). रिंकूला तिच्या बिनधास्त अभिनय कौशल्यामुळे प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. रिंकू पहिल्याच चित्रपटात हिट झाली. सैराटनंतर तिला अनेक सिनेमांची ऑफर मिळत आहे आणि तिची लोकप्रियताही वाढत आहे. रिंकू कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते. अलीकडच्या काही वर्षांत रिंकूमध्ये झालेल्या ट्रान्सफॉर्मेशनने सर्वच थक्क झाले आहेत. सैराटमधील रिंकू आणि आताची रिंकू दोघींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात