महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. प्राजक्ता आता महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये ही परत आली आहे.
प्राजक्ताला आजवर आपण अनेक लुकमध्ये पाहिलं आहे. तिच्या एकाहून एक सुंदर सुंदर साड्यांची भुरळ प्राजू नेहमीच तिच्या प्रेक्षकांवर घालत असते.
पैठणी, बनारसी, स्टायलिश साड्यांपासून आजवर सगळ्या साड्या प्राजक्तानं नेसल्या आहेत. प्राजक्ताला प्युअर कॉटनच्या साड्या विशेष आवडतात.
काळ बदलतोय तसा साड्या नेसण्याची पद्धतही बदलत चालली आहे. प्राजक्ता अगदी पारंपरिक ते स्टायलिश अशा सगळ्याचं लुकमध्ये फिट बसते. नवीन नवीन लुक्सही ती नेहमी ट्राय करत असते.
हल्ली साड्यांवर पट्टा लावण्याची स्टाइल आली आहे. अगदी कॉटनच्या साड्यांपासून सिल्क, शिफॉन सगळ्या साड्यांवर पट्टा लावून एक हटके लुक आणण्याचा प्रयत्न केला जातो.
अभिनेत्री प्राजक्ता माळीनं देखील साडीवर पट्टा लावून स्टायलिश लुकमध्ये फोटोशूट केलंय. मात्र साड्यांवर पट्टा लावण्याचा हा नवा प्रकार प्राजक्ताच्या काही पसंतीस उतरलेला दिसत नाही. प्राजूनं साडीवर बेल्ट लावायची गरजच काय? असा प्रश्न केला आहे.
या प्रश्नाचं उत्तर देत प्राजक्तानं म्हटलंय, कधी कशाची fashion होईल सांगतां येत नाही. त्यामुळे मग काहीही असो, हसत आनंदानं ते दाखवा आणि पुढे जा.
फॅशन ट्रेंड येतात जातात पण स्वॅग आणि एटीट्युड कायम राहतो, असं म्हणतं चाहत्यांची प्राजक्ताचं कौतुक केलं आहे.