Home /News /entertainment /

जॅकी श्रॉफसमोर पत्नीनं केली गुंडांची धुलाई; अभिनेत्यानं सांगितला भन्नाट किस्सा

जॅकी श्रॉफसमोर पत्नीनं केली गुंडांची धुलाई; अभिनेत्यानं सांगितला भन्नाट किस्सा

हा किस्सा आहे त्यांच्या पत्नीचा. त्यांच्या पत्नीनं कशा प्रकारे त्यांना व त्यांच्या मित्राला गुंडांपासून वाचवलं होतं?

    मुंबई 5 जुलै: जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) हे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेते म्हणून ओळखले जातात. चित्रपटांसोबतच ते आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळं देखील चर्चेत असतात. अनेक मुलाखतींमध्ये ते आपल्या आयुष्यातील गंमतीदार किस्से सांगून चाहत्यांना आश्चर्यचकित करतात. यावेळी देखील त्यांनी असाच एक अवाक् करणारा किस्सा सांगितला आहे. हा किस्सा आहे त्यांच्या पत्नीचा. त्यांच्या पत्नीनं कशा प्रकारे त्यांना व त्यांच्या मित्राला गुंडांपासून वाचवलं होतं? ‘...म्हणून प्रियांकानं तुला तोंडावर पाडलं’; नेटकऱ्यानं केली सोना मोहपात्राची बोलती बंद जॅकी यांनी अलिकडेच पत्नी आयशासोबत डान्स दिवाने या शोमध्ये हजारी लावली होती. त्यावेळी त्यांनी ते पत्नीला खूप घाबरतात असं मान्य केलं होतं. अन् त्यामागचं थक्क करणारं कारण देखील त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, “माझं केवळ नाव दादा आहे. पण मी खूप भीत्रा आहे. एकदा मी, माझी पत्नी आणि माझा एक मित्र आम्ही रस्त्यावर चालत होतो. तेव्हा एका मवाली तरुणासोबत थोडे मतभेद झाले. तो मुलगा त्याची गँगच घेऊन आला. आम्ही त्यांना घाबरलो. पण माझी पत्नी पुढे गेली अन् तिनं एकाला चांगलंच धुवून काढलं. हा प्रकार पाहून ते गँगवाले देखील अवाक् झाले. अन् तेव्हापासून मी माझ्या पत्नीला घाबरतो. उगाच माझी देखील अशीच धुलाई करायची.” हा गंमतीशीर किस्सा ऐकून सर्वांनी एकच हास्यकल्लोळ केला. 28 वर्षांपूर्वी शेफाली शाह कशी दिसायची? व्हायरल झालं जुने Photo जॅकी आणि आयशा यांची पहिली भेट झाली तेव्हा आयशा केवळ 13 वर्षांच्या होत्या. लक्षवेधी बाब म्हणजे पुढे काही वर्षानंतर जॅकी देखील त्यंच्या प्रेमात पडले. 1887 साली दोघांचं लग्न झालं. टायगर श्रॉफ आणि कृष्णा श्रॉफ अशी त्यांना दोन मुलं आहेत. जॅकी आज वयाच्या पंन्नाशीनंतरही तितक्याच उत्साहानं चित्रपटात काम करताना दिसतात.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood actor, Entertainment, Jackie shroff

    पुढील बातम्या