Home /News /entertainment /

'गंदी बात' फेम अभिनेत्रीला हृदयविकाराचा झटका; नुकताच मिळाला होता जामीन

'गंदी बात' फेम अभिनेत्रीला हृदयविकाराचा झटका; नुकताच मिळाला होता जामीन

‘गंदी बात’ या अडलट् शोमुळे गहना लोकप्रिय झाली होती.

  मुंबई, 5 जुलै- ‘गंदी बात’ (Gandi Baat) फेम अभिनेत्री गहना वशीष्ठला (Gehana Vasisth) हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गहनावर मुंबईच्या एका हाय प्रायवेट रुग्नालयात उपचार सुरु आहेत. गहनाला शनिवारीचं हृदयविकाराचा झटका आल्याचं म्हटलं जातं आहे. मात्र ही माहिती आज सर्वांसमोर आली आहे. गहना मागच्या आठवड्यातचं जामिनावर बाहेर आली होती.
  ‘गंदी बात’ या अडलट् शोमुळे गहना लोकप्रिय झाली होती. तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजासाठी तिला ओळखलं जातं. गहनाला डायबिटीज आहे. तिला वेळेवर इन्शुलंस देण्याची आवश्यकता असते. अन्यथा तिची तब्येत खुपचं खराब होते. अशातच तिला शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गहनाच्या एका जवळच्या व्यक्तीने याबद्दलची माहिती माध्यमांना दिली आहे. गहनाला चक्क दुसऱ्यावेळी हृदय विकाराचा झटका आला आहे. याआधीसुद्धा तिला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी ती 3 दिवस ऑक्सिजनवर होती. (हे वाचा:पती राज कौशलच्या निधनानंतर मंदिरा बेदी प्रथमच सोशल मीडियवर झाली व्यक्त  ) तसेच सध्या तिची परिस्थिती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. गहना गेल्या अनेक दिवसांपासून जेलवारी करत आहे. तिच्यावर पोर्न व्हिडीओ बनवण्याचा आणि तो इंटरनेटवर अपलोड करण्याचा आरोप आहे. याच संदर्भात तिला मडगाव पोलिसांनी अटक केली होती. नुकताच ती गेल्या आठवड्यात जामीनावर बाहेर आली होती. गहना छत्तीसगडची राहणारी आहे. तिच्या पाठीमागे एक भाऊ आणि वडील असा कुटुंब आहे. तिच्या आईचं निधन झालं आहे. तसेच गहनाने मिस आशिया बिकिनीचा किताब पटकावला आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Actress, Bollywood, Entertainment

  पुढील बातम्या