मुंबई, 18 मे : ऋषी कपूर यांनी 30 एप्रिलला जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्यानं फक्त त्यांची फॅमिलीच नाही तर संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला बसला. त्यांना जाऊन आता बरेच दिवस झाले मात्र कपूर फॅमिली अद्याप या धक्क्यातून सावरलेली नाही. ऋषी कपूर यांची पत्नी नीतू आणि मुलगी रिद्धीमा सतत त्यांचे थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. रिद्धीमा आणि ऋषी कपूर यांच्यात एक खास बॉन्डिंग होतं. पण आता रिद्धीमानं आपल्याला आपले वडील पुन्हा कधीच दिसणार नाहीत ही गोष्ट स्वीकारली आहे. नुकताच रिद्धीमानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक फॅमिली फोटो शेअर केला आहे. ज्यात तिच्यासोबत नीतू कपूर, रणबीर कपूर आणि तिची मुलगी समारा दिसत आहे. मात्र या फोटोमध्ये ऋषी कपूर कुठेच दिसत नाहीत. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर लॉकडाऊनमुळे रिद्धीमाला त्यांचं अंतिम दर्शनही घेता आलं नव्हतं. ती त्यांच्या निधनाच्या दोन दिवसांनंतर मुंबईमध्ये पोहोचली होती. त्यानंतर अस्थि विर्सजन आणि अन्य सर्व विधींच्या वेळी ती आपल्या कुटुंबांसोबत होती.
काही दिवसांपूर्वी रिद्धीमानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर वडील ऋषी कपूर यांचा एक फोटो शेअर केला होता. ज्यात ऋषी कपूर त्यांच्या नातीसोबत दिसत होते. रिद्धीमाची मुलगी समारा आपल्या आजोबांसोबत आपला वाढदिवस साजरा करताना दिसत होती. या फोटोमध्ये दोघांसमोर एक केक ठेवला होता आणि ऋषी कपूर आपल्या लाडक्या नातीसोबत केक कापताना दिसत होते. सोशल मीडियावर त्यांचा हा फोटो खूप व्हायरल झाला होता. मिलिंद सोमणनं शेअर केला 25 वर्षांपूर्वीचा वादग्रस्त Nude Photo, म्हणाला… प्रवासी मजूरांच्या मदतीला धावून आला अभिनेता, अशी केली घरी जाण्याची सोय