मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘पुरुषांच्या चुकीसाठी महिला दोषी नसतात’; रिचा चड्ढाचा शिल्पा शेट्टीला पाठिंबा

‘पुरुषांच्या चुकीसाठी महिला दोषी नसतात’; रिचा चड्ढाचा शिल्पा शेट्टीला पाठिंबा

‘पॉर्न प्रकरणात शिल्पा शेट्टीचा काहीही दोष नाही’; रिचाने ट्रोलर्सवर साधला निशाणा

‘पॉर्न प्रकरणात शिल्पा शेट्टीचा काहीही दोष नाही’; रिचाने ट्रोलर्सवर साधला निशाणा

‘पॉर्न प्रकरणात शिल्पा शेट्टीचा काहीही दोष नाही’; रिचाने ट्रोलर्सवर साधला निशाणा

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 1 ऑगस्ट: पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्याच्याविरोधात सतत नवनवी माहिती समोर येत आहे. (Raj Kundra pornography case) त्यामुळे कोर्टाने त्याच्या कोठडीत देखील आणखी 14 दिवसांची वाढ केली आहे. मात्र या सर्व प्रकरणाचा थेट परिणाम शिल्पाच्या (Shilpa Shetty) आयुष्यावर देखील पडला आहे. तिच्यावर देखील मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. शिवाय जाहिराती, टीव्ही शो आणि इतरत्र अनेक मोठ्या प्रोजेक्टमधून तिची हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी अभिनेत्री रिचा चड्ढा (Raj Kundra) हिने शिल्पाला पाठिंबा दिला आहे. दर वेळी पुरुषांच्या कृत्याची शिक्षा स्त्रियांनाच का भोगावी लागले? असा सवाल तिने केला आहे.

“आपण हा खेळ बनवलाय की जेव्हा एखाद्या पुरूषाची चूक असते तेव्हा आपण त्याच्या आयुष्यात असलेल्या स्त्रीला प्रत्येक चूकांसाठी दोषी ठरवत असतो. बरंय शिल्पाने तक्रार केलीय.” अशा आशयाचं ट्विट करून रिचाने शिल्पा शेट्टीला पाठिंबा दिला आहे.

अर्जुन-जान्हवीच्या नात्यात का होता दुरावा? 15 वर्ष केलं नव्हतं संभाषण

‘मुंबई पोलिसांनी 15 लाख मागितले’; गहना वश‍िष्ठचा खळबळजनक आरोप

राज कुंद्रा प्रकरणात सोशल मीडियाद्वारे शिल्पा शेट्टीला दोषी ठरवलं जात आहे. परंतु या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही असा दावा शिल्पाने केला आहे. शिवाय 29 वृत्तवाहिन्या आणि मीडिया हाऊस विरोधात अश्लील चित्रपट प्रकरणात खोटी बातमीदारी करणे आणि आपली प्रतिमा खराब केल्याबाबत, मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे.

First published:

Tags: Porn video, Richa chadha, Shilpa shetty