Home /News /entertainment /

‘मुंबई पोलिसांनी 15 लाख मागितले’; गहना वश‍िष्ठचा खळबळजनक आरोप

‘मुंबई पोलिसांनी 15 लाख मागितले’; गहना वश‍िष्ठचा खळबळजनक आरोप

तुरुंगातून सुटून आलेल्या गहनाने दिला राज कुंद्राला पाठिंबा; मुंबई पोलीस पैशांसाठी दबाव टाकत असल्याचा केला आरोप

    मुंबई 1 ऑगस्ट: राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात सतत नवनवे खुलासे होत आहेत. (Raj Kundra pornography case) परिणामी राज कुंद्राच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणात अभिनेत्री गहना वशिष्ठ (Gehana Vasisth) ही देखील अडकली आहे. तिच्यावर देखील पॉर्नोग्राफीचे आरोप आहेत. परंतु तिने या आरोपांसाठी मुंबई पोलिसांनाच (Mumbai police) उलट जबाबदार धरलं आहे. “राज कुंद्रा आणि एकता कपूरचं नाव घेण्यासाठी पोलीस माझ्यावर दाबाव टाकतायेत”, असे उलट आरोप तिने केले आहेत. बॉयफ्रेंडसह रसिकाचं Bold फोटोशूट; सोशल मीडियावर आहे या कपलचीच चर्चा इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत गहनाने पॉर्नोग्राफी प्रकरणावर भाष्य केलं. ती म्हणाली, “पोलीस अत्यंत बेछुट आरोप करतायेत. याच वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांनी माझ्यावर आरोप केले. ज्यावेळी त्यांनी मला अटक केली तेव्हा माझ्याकडे 15 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. जर मी पैसे दिले तर मला ते सोडतील असं म्हणाले होते. परंतु मी नकार दिला. त्यानंतर राज कुंद्रा आणि एकता कपूर यांचं नाव घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला. परंतु मी दबावाला बळी पडले नाही. त्यामुळे खोट्या आरोपांखाली मला अटक करण्यात आली. राजने देखील चुकीचं असं काहीही केलेलं नाही. पोलीस उगाचच नकोत्या प्रकरणामध्ये आम्हाला अडकवतायेत.” छोटा पांड्या झाला एक वर्षांचा; नताशाने असा केला मुलाचा वाढदिवस साजरा राज कुंद्रा कसा करायचा Pornography बिझनेस? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज लंडनमधील केनरिन नामक एका कंपनीसाठी या पॉर्नपटांची निर्मिती करतो. ही कंपनी भारतात हॉटशॉट नावाचं एक अॅप चालवते. या अॅपवर इतर OTT प्लॅटफॉर्मप्रमाणे महिन्याचं वगैरे सबस्क्रिप्शन मिळत नाही. तर प्रेक्षकांना प्रत्येक चित्रपट किंवा सीरिजसाठी वेगळे पैसे द्यावे लागतात. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार राजने या अॅपवरील अश्लील व्हिडीओंच्या माध्यमातून जवळपास 500 कोटी रुपयांचा नफा आतापर्यंत मिळवला आहे. इंटरनेटवर हजारो पॉर्न वेबसाईट कार्यरत आहेत. गुगलच्या एका सर्वेनुसार भारतातील इंटरनेट युजर सरासरी 8 मिनिटं 23 सेकंद अशा वेब साईटवर घालवतो. या पार्श्वभूमीवर हॉटशॉटने कमी वेळात मोठ्या प्रमाणावर सबस्क्राईबर्स मिळवले होते. अन् त्यामधून नफा देखील कोट्यवधींचा मिळत होता.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Crime, Porn video, Raj kundra, Shilpa shetty

    पुढील बातम्या