नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी: बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढा (Richa Chadha) आणि अभिनेता अली फजल (Ali Fazal) दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 74 व्या वेनिस फिल्म फेस्टिवलदरम्यान या दोघांनी आपले नाते जगजाहिर केले होते. दोघांनी एकत्र रेड कार्पेटवर उतरत लोकांना सरप्राईज दिले होते. तेव्हापासून आजपर्यंत या कपलच्या लग्नाची (Richa Chadha and Ali Fazal wedding) चर्चा रंगली आहे. अखेर त्यांच्या लग्नासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. बॉलीवूड अभिनेता अली फजल आणि ऋचा चड्ढा हे दोघेही गेल्याच वर्षी लग्न करणार होते. पण देशभरात सुरू असलेल्या करोना परिस्थितीमुळे त्यांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली होती. हे दोघेही त्यांच्या सोशल मीडियावर अकाउंटवर बरेच सक्रिय असतात. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार दोघे पुढच्या महिन्यात लग्न बंधनात अडकणार आहेत. ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, ऋचा चड्ढा- अली फजल हे दोघे पुढच्या महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात सात फेरे घेणार आहेत. दोघांच्या ‘फुकरे 3 (Fukrey 3)’ या चित्रपटाचे शूटिंग दिल्लीत होणार आहे, त्यादरम्यान दोघे शूटिंगमधून ब्रेक घेऊन दिल्लीहून मुंबईला येतील आणि त्यानंतर रितीरिवाजानुसार लग्न करून पुन्हा शूटिंगसाठी रवाना होतील. अशी माहिती मिळाली आहे. या चित्रपटात पुलकित सम्राट आणि वरुण शर्मा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अली फजलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या लग्नासंदर्भात भाष्या केले होते. गेली 2 वर्षे सर्वांसाठी निरुपयोगी होती, त्यामुळे आम्ही लग्न काही काळासाठी स्थगित केले. पण आम्ही नवीन वर्षाची वाट पाहत आहोत. कोरोनामुळे लग्नाला उशीर होत आहे, पण यावर्षी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये पुन्हा प्लॅन करता येईल असे सांगत दोघे यंदाच्या वर्षीच लग्नबंधनात अडकणार असल्याचे संकेत दिले. अलीकडेच ऋचा आणि अलीने सहकार्याने एक प्रोडक्शन हाऊस देखील उघडले आहे. अभिनेत्यांच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर अली फजलकडे हॉलिवूड चित्रपट ‘डेथ ऑन द नाईल’ आणि ‘फुकरे 3’ यासह अनेक मोठे चित्रपट आहेत. त्याचबरोबर तिग्मांशु धुलियाच्या ‘द ग्रेट इंडियन मर्डर’ या वेबसीरिजमध्ये ऋचा चड्ढामुख्य भूमिकेत दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.