अद्यायावत तंत्रज्ञानामुळं सरकार आणि सामान्य माणूस यामधील दरी आता पहिल्यापेक्षा कमी झाली आहे. अन् याचा थेट परिणाम काळ्या पैशांवर झाला. डिजिटल करंसीमुळं देशातील काळा पैसा कमी झाला आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनं केलं. दरम्यान त्यांच्या या भाषणावर अभिनेत्री रिचा चड्ढा संतापली आहे. “खरोखरच देशाला तुम्ही कॅशलेस केलं” असा उपरोधिक टोला तिनं लगावला आहे.
नुकत्याच झालेल्या नासकॉम टेक्नॉलॉजी अँड लिडरशीप फोरम या कार्यक्रमात मोदींनी देशाच्या आयटी सेक्टरचं कौतुक केलं. सरकारनं तंत्रज्ञानाचा वापर करुन देशात अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या. प्रशासकीय कामांत वेग प्राप्त झाला. असं म्हणत मोदींनी देशातील काळ्या पैशांवर भाष्य केल. डिजिटल करंसीमुळं देशातील काळा पैसा कमी झाला असा दावा त्यांनी या भाषणादरम्यान केला. मात्र त्यांच्या या भाषणावर अभिनेत्री संतापली आहे. हे अत्यंत प्रमाणिक विधान आहे. खरोखरच तुम्ही देशाला कॅशलेस केलंत अशा आशयाचं ट्विट करुन तिनं मोदींना उपरोधिक टोला लगावला.
This is a very honest admission. There is less cash. https://t.co/2ZwVdGzqeT pic.twitter.com/OmbVxsUhmt
— TheRichaChadha (@RichaChadha) February 17, 2021
अवश्य पाहा - कन्यादान आणि पाठवणी का नाही?; दिया मिर्झानं टीकाकारांना दिलं उत्तर
रिचा चड्ढा बॉलिवूड सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशभरातील राजकारण अशा विविध विषयांवर ती रोखठोकपणे प्रतिक्रिया देते. केंद्र सरकारच्या निर्णयांवर आजवर तिने अनेकदा टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर तिचं हे ट्विट सध्या चर्चेत आहे. काही तासातं हजारो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Bollywood, Modi government, Money, PM narendra modi, Richa chadha, Social media