मुंबई, 18 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली. 39 वर्षीय दियानं तिचा खास मित्र वैभव रेखीची लग्न केलं. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओज सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. मात्र हे फोटो पाहून लग्नात कन्यादान आणि पाठवणी का झाली नाही?असा प्रश्न वारंवार चाहते तिला विचारत आहेत. अखेर चाहत्यांच्या आग्रहाखातर दियानं त्या विधी न करण्याचं कारण सांगितलं. हे कारण पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.
दियानं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करुन आपल्या लग्नाची गोड बातमी चाहत्यांना दिली. शिवाय तिनं चाहत्यांच्या प्रश्नांच्या उत्तर देखील दिली आहेत. “हा परिवर्तनाचा काळ आहे. कन्यादान हे वडिल आपल्या मुलीला स्वत:पासून दूर करतात त्याचं प्रतिक आहे. आणि पाठवणी हे घर सोडण्याचं प्रतिक. परंतु काळ आता बदलला आहे. अन् आपण बदल स्विकारायला हवा. त्यामुळे माझ्या लग्नात पुरुषाऐवजी एका महिला पुजाऱ्यानं विधी केले. काही लोकांनी याबाबत टीका केली मात्र या सर्वांना मी सांगू इच्छिते की, लग्न हे दोन जिवांचा आत्मा असतो. या नात्यात प्रेम, आश्चर्य, विश्वास, उर्जा, कोमलता आणि सहानुभूती या गोष्टी असतात. त्यामुळं विधी कोणी त्याऐवजी विधी का करतात या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं.” दियानं अशा आशयाची एक लांबलच पोस्ट लिहून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
View this post on Instagram
अवश्य पाहा - रेखाच्या BOLD सीनमुळं उडाली होती खळबळ; शेखर सुमन यांचा ‘उत्सव’ पुन्हा चर्चेत
दियाशी लग्न करणारा वैभव हा मुंबईतील एक प्रसिद्ध उद्योजक आहे. शेअर मार्केट आणि विविध प्रकारच्या धातूंमध्ये तो पैसे गुंतवतो. दियाप्रमाणेच वैभवचं देखील हे दुसरं लग्न आहे. सुनैना रेखी असं त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव आहे. ती एक योगा कोच आहे. बॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकारांना ती योगाचं प्रशिक्षण देते. अंतर्गत मतभेदांमुळे त्यांचा घटस्फोट झाला. दियानं 15 फ्रेब्रुवारी रोजी घरातच मोजक्याच लोकांना आमंत्रीत करुन लग्न केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.