मुंबई 25 जून: प्रसिद्ध गायिका, अभिनेत्री ब्रिटनी स्पिअर्स (Britney Spears) हिने आपल्या वडिलांविरोधात आर्थिक फसवणुकीचे आरोप केले आहेत. वडील जेमी स्पिअर्स तिची संपत्ती बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा तिनं केला आहे. (#FreeBritney) या प्रकरणात हॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकारांनी तिची बाजू घेतली आहे. परंतु यामध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिनं. ब्रिटीनीला स्वातंत्र्य द्या अशी मागणी तिनं केली आहे.
सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणामुळं रिया चक्रवर्ती सध्या चर्चेत आहे. या प्रकरणात ती संशयीत आरोपी आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिला अटक देखील केली होती. या पार्श्वभूमीवर सध्या तिची प्रत्येक पोस्ट लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान आतापर्यंत सुशांतबाबत पोस्ट करणाऱ्या रियानं यावेळी ब्रिटनी स्पिअर्ससाठी आवाज उठवला आहे. “तिला स्वतंत्र करा” अशी मागणी तिनं इन्स्टाग्रामद्वारे केली आहे.
चाहत खन्ना बेरोजगार; दोन मुलांची आई झाल्यामुळे देत नाही कोणी काम
‘माझ्याशिवाय आणीबाणी कोणालाच कळणार नाही’; कंगनानं दिग्दर्शकालाच चित्रपटातून केलं बाहेर
ब्रिटनी स्पिअर्सचं नेमकं प्रकरण काय आहे?
टीएमझेडने दिलेल्या वृत्तानुसार ब्रिटनी गेल्या काही वर्षांपासून नैराश्येमध्ये होती. या काळात जेमी स्पिअर्स तिच्या संपत्तीची देखभाल करत होते. परंतु अभिनेत्री नैराश्येत असल्याचा गैरफायदा घेत त्यांनी कंपनीच्या कामात आर्थिक घोळ घातला, असा आरोप ब्रिटनीने केला आहे. शिवाय या प्रकरणी तिनं कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे. तिला तिचं स्वातंत्र्य परत हवं आहे, असं तिनं त्या याचिकेत म्हटलं आहे. शिवाय, “माझे वडील घोटाळेखोर आहेत. त्यांना तुरुंगात टाका.” अशी विनंती देखील तिनं कोर्टात केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.