मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘माझ्याशिवाय आणीबाणी कोणालाच कळणार नाही’; कंगनानं दिग्दर्शकालाच चित्रपटातून केलं बाहेर

‘माझ्याशिवाय आणीबाणी कोणालाच कळणार नाही’; कंगनानं दिग्दर्शकालाच चित्रपटातून केलं बाहेर

कंगनानं केली इंदिरा गांधी यांच्या बायोपिकपटाची घोषणा; स्वत:च करणार चित्रपटाचं दिग्दर्शन, कारण...

कंगनानं केली इंदिरा गांधी यांच्या बायोपिकपटाची घोषणा; स्वत:च करणार चित्रपटाचं दिग्दर्शन, कारण...

कंगनानं केली इंदिरा गांधी यांच्या बायोपिकपटाची घोषणा; स्वत:च करणार चित्रपटाचं दिग्दर्शन, कारण...

मुंबई 25 जून: बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रणौत (Kangana Ranaut) भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या भूमिकेत झळकणार आहे. कंगनानं इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीवर बायोपिक तयार करत असल्याची घोषणा केली. आधी या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन साई कबीर करणार होता. परंतु आता कंगनानं त्याला चित्रपटातून बाहेर काढत स्वत:च दिग्दर्शनाची जबाबदारी स्विकारली आहे. (Kangana Ranaut to direct Indira Gandhi film Emergency) सोबतच माझ्याशिवाय आणीबाणीचा काळ कोणाला कळूच शकत नाही असा दावा देखील तिनं केला आहे.

हॉटेलमधील जेवण अभिनेत्याला पडलं महागात; गाडी फोडून लॅपटॉप चोरीला

“मी पुन्हा एकदा दिग्दर्शन क्षेत्रात उतरते आहे. जवळपास 1 वर्ष मी आणीबाणीवर अभ्यास करतेय. त्यामुळं माझ्याशिवाय इतर दुसरा कोणीही आणीबाणीवर चित्रपट तयार करु शकेल असं मला वाटत नाही. रितेश शाह सध्या पटकथेवर काम करत आहेत. या चित्रपटासाठी मला इतर कामांचं बलिदान द्याव लागलं तरी देखील माझी तयारी आहे.” अशा आशयाची पोस्ट कंगनानं केली आहे. ट्विटरवर तिचं अकाउंट बंद केल्यामुळं सध्या ती कू या अॅपवर पोस्ट करत आहे.

‘राजा हिंदुस्तानी’मधील किसिंग सीन कसा केला शूट? करिश्मा कपूरनं सांगितला अनुभव

कंगनाचे चाहते सध्या तिच्या ‘थलाईवी’ या चित्रपटाची उत्सुकतेनं वाट पाहात आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनचं चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. कंगनाच्या या चित्रपटाला एक दिवसापूर्वीचं सेन्सॉर बोर्डकडून ‘यू’ सर्टिफिकेट मिळालं आहे. कंगनाचा हा चित्रपट 23 एप्रिलला रिलीज होणार होता. मात्र कोरोना महामारीमुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

First published:

Tags: Entertainment, Kangana ranaut