चाहत खन्ना बेरोजगार; दोन मुलांची आई झाल्यामुळे देत नाही कोणी काम
लग्न झाल्यामुळं अभिनेत्रीच्या करिअरला लागली उतरती कळा
|
1/ 6
बडे अच्छे लगते है या मालिकेतून घराघरात पोहोचलेली चाहत खन्ना छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. परंतु लोकप्रिय असताना देखील गेल्या काही काळापासून ती बेरोजगार आहे.
2/ 6
चाहतनं 2013 साली फरहान मिर्झासोबत लग्न केलं. लग्नानंतर तिला लगेचच मुलं झाली. त्यामुळं मुंलांचा सांभाळ करण्यासाठी तिनं मालिकेतून ब्रेक घेतला होता.
3/ 6
या दरम्यान ती आपल्या पतीसोबत त्यांच्या फॅमेली बिझनेस सांभाळत होती. परंतु 2018 मध्ये तिचा घटस्फोट झाला. तेव्हापासून ती आपल्या दोन मुलांसोबत एकटी राहात आहे.
4/ 6
आता चाहतला छोट्या पड़द्यावर पुनरागमन करायचं आहे. यासाठी ती गेली दोन वर्ष सातत्यानं ऑडिशन देत आहे. परंतु तरी देखील तिला काम मिळत नाहिये.
5/ 6
मुलांचा सांभाळ करण्यासाठी आर्थिक बाजू भक्कम असणं गरजेचं आहे. त्यामुळं ती काम शोधतेय. पण दोन मुलांची आई असल्यामुळं तिला कोणाही काम देण्यास तयार नाही असा अनुभव तिनं सांगितलां.
6/ 6
काही निर्मात्यांच्या मते तिचा मार्केट वॅल्यू संपला आहे. तिच्यासारखा दोन मुलांच्या आईला पडद्यावर हिरोईन म्हणून पाहण्यास कोणी तयार नाही. त्यामुळं तिनं अभिनयाऐवजी दुसरी एखादी नोकरी करावी. असा देखील सल्ला मिळत असल्याचं ती म्हणाली.