मुंबई, 01 मार्च: बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput ) मृत्यूचं (Death) प्रकरण ऐन वादात असताना बॉलीवूड अभिनेत्री रिया (Rhea Chakraborty) चक्रवर्तीने पुरुषप्रधान संस्कृतीवर खोचक भाष्य करणारा एक टी शर्ट (T shirt) परिधान केला होता. त्यामुळे ती खूपच चर्चेत आली होती. त्यानंतर तिने आता दुसऱ्यांदा पुरूषप्रधान संस्कृतीच्या कानशीलात लगावणारा संदेश लिहिलेला टी शर्ट परिधान केला आहे. त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बॉलीवूड अभिनेत्री आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीला नुकतंच मुंबई विमान तळावर पाहिलं गेलं आहे. यावेळी ती वडील इंद्रजित चक्रवर्ती आणि भाऊ शोविक यांच्यासोबत दिसली आहे. याठिकाणी आल्यानंतर तिने आपल्या चाहत्यांना ऑटोग्राफही दिला आहे. यावेळी तिने परिधान केलेल्या टी शर्टची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता रियाने एक पांढऱ्या रंगाचा ओव्हरसाईज टी शर्ट परिधान केला आहे, ज्यावर ‘Man Up’ (मर्द बना) असं लिहिलं आहे. यापूर्वी तिने पुरुषप्रधान संस्कृतीवर भाष्य करणारा संदेश लिहिलेला टी शर्ट परिधान केला होता. त्यावेळी तिच्या टी शर्टवर ‘Roses are red, violets are blue, Let’s smash patriarchy, Me and you’ असं लिहिलं होतं.
खरं तर सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात अडकल्यापासून रिया चक्रवर्तीने स्वतः ला सोशल मीडिया पासून दूर ठेवलं आहे. परंतु ती लवकरचं मोठ्या पडद्यावर पुनरागमन करू शकते. कारण रिया लवकरच आपल्या एका नवीन चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणार असल्याची माहिती दिग्दर्शक रुमी जाफरी यांनी केली होती. हे ही वाचा- पोज देतानाच ड्रेसनं केली रकुल प्रीत सिंगची फजिती, Oops Moment कॅमेऱ्यात कैद तथापि, अलिकडेचं तिच्या ‘चेहरे’ या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. पण या पोस्टरमध्ये रिया चक्रवर्तीचा चेहरा दाखवला नाही. असं म्हटलं जात आहे की, कोणत्याही प्रकारच्या वादंगापासून बचाव करण्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी रियाला पोस्टरमध्ये स्थान दिलं नाही. त्यामुळे आता टीजर किंवा ट्रेलरमध्ये रिया चक्रवर्तीला दाखवलं जातं का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात रियावर अनेक गंभीर आरोप झाले होते. मात्र अद्यापपर्यंत सुशांतच्या मृत्यूशी संबंधित कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही.