मुंबई 01 मार्च : बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh)मागील काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. लवकरच अभिनेत्री महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अजय देवगण (Ajay Devgan) यांच्यासोबत एका चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. रकुल या सिनेमाबद्दल खूप उत्सुक आहे, हे तिनं याआधीच सोशल मीडियावर (Social Media) सांगितलं आहे. हा सिनेमा आहे MayDay. या सगळ्याशिवाय अभिनेत्री आपल्या फॅशन सेन्समुळंही भरपूर चर्चेत असते. आता तिचा समर लूक सध्या चर्चेत आहे. मात्र, स्टायलिश असणारा रकुलचा हा लूक आता तिच्यासाठी मोठी अडचणही ठरला आहे.
रकुल आपल्या या ड्रेसमुळे Oops Moment ची शिकार झाली आहे. नुकतंच अभिनेत्रीला लेमन यलो कलरचा ड्रेस आणि डेनिम जॅकेटमध्ये स्पॉट केलं गेलं. तिनं आपला हा लूक पांढऱ्या रंगाच्या शूजसोबत पूर्ण केला. मात्र, फोटोग्राफर्सला पोज देण्यासाठी रकुल उभा राहाताच तिचा ड्रेस हवेनं उडू लागला. अभिनेत्रीनं आपल्या हातानं ड्रेस पकडत कसंतरी परिस्थिती सांभाळून नेली, मात्र हे सगळं कॅमेऱ्यामध्ये कैद झालं.
अभिनेत्री या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. रकुलनं आपले केस मोकळे सोडले होते आणि खूप कमी मेकअप केला होता. या सगळ्या सोबतच तिच्या बॅगचीही बरीच चर्चा झाली. ड्रेससोबतच अभिनेत्रीच्या या बॅगची किंमत सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.