मुंबई 13 सप्टेंबर: अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बऱ्याच काळापासून प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या रियाने आता एक ग्लॅमरस शूट केलं आहे. सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर रियाच्या आयुष्यात मोठं वादळ आलं होतं. पण आता पुन्हा एकदा ती तिच्या ग्लॅमरस अवतारात परतत आहे. पुन्हा एकदा ती नव्या अवतारात दिसत आहे.
रिया चक्रवर्ती एकेकाळी सोशल मीडियावर खूप सक्रिय होती, पण सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर तिने या सर्व गोष्टींपासून स्वतःला दूर केलं होतं. पण पुन्हा एकदा तिने स्वतःला ग्लॅमरस लुकमध्ये चाहत्यांना घायाळ केलं आहे.
View this post on Instagram
रिया ने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये ती ग्लॅमरस लुक पोझ देत आहे. रियाने ब्रालेटसह नेट टॉप घातला आहे आणि त्याला लेदर पॅन्टसह दिसत आहे. तिच्या या फोटोवर स्टार्स आणि चाहत्यांकडून बर्याच प्रतिक्रिया येत आहेत. फोटो शेअर करताना रियाने कॅप्शनमध्ये लिहिले - 'PEACE OUT' तिने हॅशटॅग दिला - #narishakti.
View this post on Instagram
याआधी रिया चक्रवर्तीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. त्यात रियाने ऑफ शोल्डर व्हाईट ड्रेस घातला होता. रियाचा 'चेहरे' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. इमरान हाश्मी, अमिताभ बच्चन, अनु कपूर चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. कोविडमुळे चित्रपटाची रिलीज डेट अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली आणि नंतर हा चित्रपट 27 ऑगस्टला रिलीज झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Rhea chakraborty, Sushant singh raajpoot