मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss 15: रिया चक्रवर्तीची होणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री? स्टुडिओबाहेर दिसली अभिनेत्री

Bigg Boss 15: रिया चक्रवर्तीची होणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री? स्टुडिओबाहेर दिसली अभिनेत्री

'बिग बॉस OTT' नंतर नुकताच 'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) चे प्रोमो सर्वत्र झळकत आहेत. प्रेक्षकांना मोठ्या आतुरतेने सीजन 15 ची प्रतीक्षा लागली आहे. येत्या २ ऑक्टोबरपासून बिग बॉस १५ आपल्या भेटीला येणार आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 28 सप्टेंबर- दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या(Sushant Singh Rajput) मृत्यूमुळे चर्चेत आलेली त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. रिया चक्रवर्ती सलमान खानच्या 'बिग बॉस १५'(Bigg Boss 15) मध्ये सहभागी होणार असल्याच्या सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत. या चर्चांना तेव्हा जोर चढला जेव्हा तेजस्वी प्रकाश, दलजित कौर आणि रिया चक्रवर्ती एकाच स्टुडिओच्या बाहेर दिसून आले.

'बिग बॉस OTT' नंतर नुकताच 'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) चे प्रोमो सर्वत्र झळकत आहेत. प्रेक्षकांना मोठ्या आतुरतेने सीजन 15 ची प्रतीक्षा लागली आहे. येत्या २ ऑक्टोबरपासून बिग बॉस १५ आपल्या भेटीला येणार आहे. सलमानने यावेळी जंगल थीम असणार याचा खुलासा आधीच केला आहे. . त्यामुळे चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. मात्र सीजन 15 मध्ये कोणते कलाकार स्पर्धक म्हणून येणार याची उत्सुकता अजूनही ताणून राहिली आहे. तत्पूर्वी काही कलाकारांची कन्फर्म नावे समोर आली आहेत. तर काही कलाकरांच्या नावाच्या चर्चा सुरु आहेत.

(हे वाचा:OMG! इतका वयस्कर दिसत आहे 'बिग बॉस'चा हा विजेता; ओळखणंही झालं कठीण)

गेली अनेक दिवस अभिनेत्री रिया चक्रवर्ती 'बिग बॉस १५'मध्ये येणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र रिया चक्रवर्तीकडून याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती मिळालेली नव्हती त्यामुळे या चर्चा थंडावल्या होत्या. मात्र आज पुन्हा एकदा या चर्चांनी जोर धरला आहे. कारण अभिनेत्री रिया चक्रवर्ती त्याचं स्टुडिओच्या बाहेर दिसून आली ज्याठिकाणी बिग बॉस १५ ची कन्फर्म स्पर्धक तेजस्वी प्रकाश आणि बिग बॉसचा माजी स्पर्धक दलजित कौर दिसून आले होते. रियाला याच ठिकाणी पाहिल्याने पुन्हा एकदा ती बिग बॉस १५ मध्ये दिसणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र याबद्दल अभिनेत्रीने अजून काहीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तिचं त्या स्टुडिओबाहेर असणं एक योगायोगही असू शकतं.

(हे वाचा:Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात 'हल्ला बोल'; धमाकेदार टास्कने रंगणार दुसरा..)

तर दुसरीकडे काही स्पर्धकांची कन्फर्म नावे समोर आली आहेत. बिग बॉस 13 चा स्पर्धक असीम रियाजचा भाऊ उमर रियाज आणि अभिनेत्री डोनल बिष्ट यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाला आहे. तसेच उमर रियाज आणि डोनल बिष्टशिवाय अजून 3 स्पर्धकांच्या नावावर शिक्का मोर्तब झाला आहे. त्यामध्ये बिग बॉस ottचा टॉप ५ स्पर्धक प्रतीक सहेजपालचा समावेश आहे. प्रतीकने शो क्वीट करत बिग बॉस १५चं तिकीट मिळवलं होतं.

First published:

Tags: Bigg boss, Entertainment, Rhea chakraborty