मुंबई 15 जुलै: भारत देश हा विविधतेने नटलेला आहे याबद्दल वाद नाही. देशाबद्दलच्या प्रतिज्ञेत सुद्धा विविध संस्कृती आणि परंपरेने नटलेल्या भारताबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. रंग माझा वेगळा या मालिकेतून सध्या लोकप्रिय होणाऱ्या अभिनेत्री रेश्मा शिंदेने (Reshma Shinde instagram) सुद्धा याच विविधतेला समोर आणत एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या स्पेशल व्हिडिओला ‘विविधतेत एकता ही इथे आहे’ अशी खास सुद्धा तिने दिल्याचं दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुस्लिम धर्मीय स्त्री एका लहानग्याच्या फोटो काढताना दिसत आहे. या लहान मुलाने गळ्यात माळ, धोतर कुर्ता घातलेला पारंपरिक वेष केला आहे. या वेशात हा मुलगा चक्क विठ्ठलाला भेटायला आलेल्या वारकऱ्यासारखा दिसत आहे. नुकत्याच झालेल्या आषाढी वारीच्या औचित्याची आठवण करून देणारा हा एक सुंदर व्हिडिओ आहे असं म्हटलं आत आहे. या व्हिडिओतून भारताची विविधता, महाराष्ट्राची परंपरा दिसून येत असल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अनेकांनी ही गोड moment कैद केल्याबद्दल रेश्माचं कौतुक सुद्धा केलं आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडीओवर फारच सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. एका युजरने लिहिलं, ‘बरं वाटलं हे बघून’. तर ‘यातूनच खरी महाराष्ट्राची संस्कृती दिसते’ असं लिहिलं आहे. एक युजर लिहितो, ‘वारकरी बालरुप खूप छान. वारकरी संप्रदाय हा एकात्मतेचा संदेश देणारा आणि अतिशय नम्र असणारा संप्रदाय आहे. खूप छान clip. 👌👌’
रेश्माने शेअर केलेल्या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडताना दिसत आहे. रेश्मा सध्या मालिकेतल्या पात्रातून बरीच लोकप्रियता मिळवताना दिसत आहे. या मालिकेला बराच चांगला प्रतिसाद आणि टीआरपी मिळताना दिसत आहे. हे ही वाचा- Kajal Kate: बापरे! शेफालीचे फोटो बघून चाहत्यांना ‘या’ हॉरर पात्राची होतेय आठवण! रेश्मा तिच्या पात्रामुळे सध्या बरीच लोकप्रिय होताना दिसत आहे. रेश्मा सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते. तिने मागे सुद्धा तिच्या मैत्रिणींसोबत धमाल करतानाचा व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना पोट धरून हसायला लावलं होतं.