माझी तुझी रेशीमगाठ मधील शेफाली म्हणजे अभिनेत्री काजल काटेची सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. तिने नुकत्याच केलेल्या एका फोटोशूटमुळे ती चर्चेचा विषय ठरली आहे. हेवी वर्क असलेला घागरा आणि त्याला साजेशी ज्वेलरी घालून तिने एक कमाल फोटोशूट केलं आहे. यामध्ये ती थेट पद्मावत सिनेमातील दीपिका पदुकोणसारखी दिसत असल्याचं म्हटलं जात आहे. पण एका चाहतीला मात्र दीपिका ऐवजी एका हॉरर भूमिकेची आठवण होत असल्याचं तिने लिहिलं आहे. काजलचे हे सुंदर फोटो बघून तिला कोण जाणे मंजुलिका हे भुलभुलैय्या सिनेमातील पात्र आठवल्याचं या चाहतीने स्पष्ट केलं आहे. ही एक कमेंट सोडता काजलचा हा लुक सगळ्यांना मोहून टाकणारा आहे असं चाहत्यांचं म्हणणं आहे. [caption id="attachment_732503" align="aligncenter" width="1600"] काजल या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसत असून सध्या तिने अनेकांना घायाळ केल्याचं दिसून येत आहे.[/caption]