जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'ही' आहे भारतातील पहिली स्टंटगर्ल; शोलेच्या शूटिंगदरम्यान मृत्यूच्या दारातून आली परत

'ही' आहे भारतातील पहिली स्टंटगर्ल; शोलेच्या शूटिंगदरम्यान मृत्यूच्या दारातून आली परत

'ही' आहे भारतातील पहिली स्टंटगर्ल; शोलेच्या शूटिंगदरम्यान मृत्यूच्या दारातून आली परत

मोठ्या पडद्यावर दिसणारे खतरनाक स्टंट पाहून आपले डोळे मोठे होतात. अनेकांना आपल्या आवडत्या अभिनेत्याला, अभिनेत्रीला काही झालं तर नाही ना ही भीती वाटते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 23 सप्टेंबर : मोठ्या पडद्यावर दिसणारे खतरनाक स्टंट पाहून आपले डोळे मोठे होतात. अनेकांना आपल्या आवडत्या अभिनेत्याला, अभिनेत्रीला काही झालं तर नाही ना ही भीती वाटते. मात्र हे धोकादायक दृष्य, भयानक स्टंट अभिनेता, अभिनेत्री करत असल्याचं दाखवलं जात असलं तरी या पडद्यामागेही एक जग आहे. हे सगळे स्टंट स्टंटबॉय किंवा स्टंटगर्ल करत असतात. कलाकारांचे बॉडी डबल बनून स्टंट करत असतात. अशाच एका स्टंटगर्लविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. 15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झालेला शोले चित्रपटानं सगळ्या प्रेक्षकांच्या मनावर एक छाप सोडली आहे. या चित्रपटातील एका दृश्यात हेमा मालिनी  तिचा टांगा खूप वेगाने धावायला लावते आणि दगडावर आदळल्यावर टांगा फुटतो. हे धोकादायक दृश्य हेमा मालिनीने नव्हे तर तिच्या बॉडी डबल रेश्मा पठाणने मोठ्या पडद्यावर साकारले होते. यावेळी रेशमा मरता मरता वाचली होती.  द शोले गर्ल रेशमा पठाण भारताची पहिली स्टंटगर्ल होती. हेही वाचा -  Kangana Ranaut साठी ही अभिनेत्री आहे रियल ‘क्वीन’; कौतुक करत म्हणाली… रेश्मा ही बॉलिवूडची पहिली स्टंट वुमन आहे. याआधी नायक आणि नायिका दोघांच्या बॉडी डबल्स म्हणून फक्त मुलंच काम करत असत, पण चित्रपटाच्या पडद्यावर अभिनेत्रीसाठी बॉडी डबल म्हणून काम करून महिलाही भारी अॅक्शन सीन करू शकतात हे पहिल्यांदाच रेश्माने जगाला दाखवून दिलं. अवघ्या काही रुपयांसाठी रेशमा नायिकेचे कपडे घालायची आणि धोकादायक स्टंट्स करायची आणि चित्रपटात मरायची. शोले, कर्ज, धरम वीर यांसारख्या सुमारे 500 चित्रपटांमध्ये रेशमाने हेमा मालिनी, रेखा, श्रीदेवी यांसारख्या बड्या हिरोईनचे बॉडी डबल बनून बरेच स्टंट केले.

News18लोकमत
News18लोकमत

पहिली स्टंट वुमन होण्यासाठी तिला असोसिएशन आणि अनेक बड्या लोकांविरुद्ध लढा द्यावा लागला, पण तिच्यामुळे आज हिंदी चित्रपटसृष्टीत मुली स्टंट कलाकार म्हणून काम करत आहेत. त्यांच्या जीवनावर बायोपिकही बनवण्यात आला आहे. या बायोपिक चित्रपटातील तिची भूमिका अभिनेत्री बिदिता बेग हिने साकारली आहे आणि तिला अलीकडेच प्रख्यात गीतकार जावेद अख्तर आणि दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्या हस्ते CCFA तर्फे लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात