जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Kangana Ranaut साठी ही अभिनेत्री आहे रियल 'क्वीन'; कौतुक करत म्हणाली...

Kangana Ranaut साठी ही अभिनेत्री आहे रियल 'क्वीन'; कौतुक करत म्हणाली...

Kangana Ranaut साठी ही अभिनेत्री आहे रियल 'क्वीन'; कौतुक करत म्हणाली...

‘पंगा क्वीन’ अशी ओळख असलेली कंगना राणौत सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. प्रत्येक मुद्द्यावर आपलं परखड मत ती मांडत असते. त्यामुळे कायमच कोणी ना कोणी कंगनाच्या निशाण्यावर असतं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 23 सप्टेंबर :  ‘पंगा क्वीन’ अशी ओळख असलेली कंगना राणौत सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. प्रत्येक मुद्द्यावर आपलं परखड मत ती मांडत असते. त्यामुळे कायमच कोणी ना कोणी कंगनाच्या निशाण्यावर असतं. मात्र यावेळी कंगना एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. यावेळी कंगना एका चित्रपटाच्या टीमचं कौतुक करताना दिसली. याविषयी तिनं सोशल मीडियावर पोस्टही शेअर केलेली पहायला मिळाली. दुल्कर सलमान आणि मृणाल ठाकूर यांचा ‘सीता रामम’ चित्रपट मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. हा चित्रपट प्रचंड चर्चेत असताना कंगनानंही हा चित्रपट पाहिला आणि चित्रपटाविषयी प्रतिक्रिया दिली. कंगनानं चित्रपटाचे आणि त्यात दिसलेल्या कलाकारांचे खुलेपणाने कौतुक केले. तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत तिने म्हटलं, ‘अखेर मला सीता रामम पाहण्याची वेळ मिळाली आणि सांगायलाच हवे की किती छान अनुभव आहे. एक महाकाव्य प्रेमकथा, विलक्षण पटकथा आणि दिग्दर्शन. अभिनंदन हनु राघवपुडी, सगळ्यांनी अप्रतिम काम केलं’.

    News18

    कंगनाने यावेळी चित्रपटाची मुख्य अभिनेत्री मृणाल ठाकूरचं विशेष कौतुक केलं. ‘सर्व कलाकारांनी उत्तम काम केले असले तरी माझ्या मते मृणाल ठाकूरने उत्कृष्ट काम केलं. राजकुमारी नूरजहाँ म्हणजेच सीता महालक्ष्मीची भूमिका मृणालने ज्याप्रकारे केली आहे, तशी अप्रतिम भूमिका कोणतीही अभिनेत्री करू शकत नाही. काय कमाल कास्टिंग केली आहे,  ती खऱ्या अर्थाने क्वीन आहे. जिंदाबाद ठाकूर साब’. कंगनाने शेअर केलेली स्टोरीचे स्क्रीन शॉट व्हायरल होत आहे. हेही वाचा -  Bipasha Basu: बिपाशा बसू-करण सिंग ग्रोव्हरने केलं डोहाळ जेवणाचं आयोजन; ड्रेसकोड आहे फारच खास दरम्यान, कंगना राणौत तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. ती अनेकदा चित्रपटाशी संबंधित खास गोष्टी सोशल मीडियावर शेअर करते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात