मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO : ‘छपाक’च्या टायटल साँग रिलीज वेळी लक्ष्मी अग्रवालला अश्रू अनावर

VIDEO : ‘छपाक’च्या टायटल साँग रिलीज वेळी लक्ष्मी अग्रवालला अश्रू अनावर

'छपाक' सिनेमाचं टायटल साँग रिलीजला दीपिकासोबत 'रिअल हिरो' लक्ष्मी अग्रवालनंही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. हे गाणं ऐकल्यावर लक्ष्मीला अश्रू आवरता आले नाहीत.

  • Published by:  Megha Jethe

मुंबई, 03 जानेवारी : अभिनेत्री दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असलेला छपाक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. ज्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून दीपिकाचं खूप कौतुक केलं जात आहे. त्यानंतर आज या सिनेमाचं टायटल साँग रिलीज झालं. यावेळी दीपिकासोबत रिअल हिरो लक्ष्मी अग्रवालनंही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

‘छपाक’चं टायटल साँग कोई चेहरा... च्या रिलीजवेळी गायक शंकर महादेवन यांनी हे गाणं लाइव्ह गायलं. यावेळी स्टेजवर उभ्या असलेली लक्ष्मी अग्रवाल भावुक झालेली दिसली. हे गाणं ऐकल्यावर लक्ष्मीला तिचे अश्रू आवरता आले नाहीत आणि ती रडू लागली. पण दीपिकानं लगेचच तिला मिठी मारत आधार दिला. स्टेजवरील हा प्रसंग सर्वांनाच भावुक करणारा होता.

'छपाक' या सिनेमाचं  शीर्षक गीत गुलजार यांनी शब्दबद्व केलं असून शंकर महादेवन आणि एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलं आहे. लक्ष्मीनं तिच्या जीवनकहाणीला योग्य न्याय दिल्याबद्दल दिग्दर्शिका मेघना गुलजार आणि दीपिका पदुकोण यांचे आभार मानले. यावेळी गुलजार आणि शंकर महादेवन आणि एहसान लॉयदेखील उपस्थित होते. शंकर महादेवन यांनी गाण्याच्या ओळी म्हणून दाखवल्या. यावेळी संगीताच्या या प्रवासात छपाकचं हे गाणं हृदयाजवळचं असेल. मेघना गुलजारच्या या सिनेमारुपी चळवळीचा भाग होणं आमच्यासाठी स्पेशल होतं असं शंकर महादेवन म्हणाले.

" isDesktop="true" id="427270" >

‘छपाक’ सिनेमा त्याच्या शूटिंगच्या पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. शूटिंग दरम्यान या सिनेमाच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते तसेच दीपिका सुद्धा अनेकदा दिल्लीमध्ये सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झाली होती. या सिनेमाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं असून हा सिनेमा 10 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच दिवशी अजय देवगणचा ‘तानाजी’ सिनेमा सुद्धा रिलीज होत आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर दोन्ही सिनेमांमध्ये तगडी टक्कर पाहायला मिळणार आहे.

First published:

Tags: Bollywood, Deepika padukone