• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • नेहा कक्करने 'इंडियन आयडॉल'ला केला रामराम; आई होणार असल्याने घेतला निर्णय?

नेहा कक्करने 'इंडियन आयडॉल'ला केला रामराम; आई होणार असल्याने घेतला निर्णय?

नेहा यांना नारळ पाणी प्यायला आवडतं.

नेहा यांना नारळ पाणी प्यायला आवडतं.

नेहा मागील काही दिवसांपासून या कार्यक्रमापासून दूर आहे. तर नेहाच्या जागेवर तिची बहीण सोनू कक्कर (Sonu Kakkar) दिसत आहे.

 • Share this:
  मुंबई 28 जुलै: बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) सध्या चर्चेत आहे. गेली अनेक सीझन ती परीक्षण करत असलेला ‘इंडियन आयडॉल’ (Indian Idol 12)  शो ती सोडणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. सोनी टीव्हीवरील (Sony Tv) लोकप्रिय शो ‘इंडियन आयडॉल 12’ आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. लवकरच त्याचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. पण याच दरम्यान आता शो ची जज दिसणार नसल्याची बातमी समोर येत आहे. नेहा मागील काही दिवसांपासून या कार्यक्रमापासून दूर आहे. तर नेहाच्या जागेवर तिची बहीण सोनू कक्कर (Sonu Kakkar) दिसत आहे. त्यामुळे नेहा चे चाहते तिची आतुरतेने वाट पहात आहेत. व ग्रँड फिनालेमध्ये तरी नेहा दिसणार का याकडे साऱ्यांच लक्ष लागलं आहे.
  राज्यात कोरोनाचा वाढता कहर पाहता लॉकडाऊन लावण्यात आलं होतं. त्यावेळी शो च शुटींग हे दमनला हलवण्यात आलं होतं. पण नेहाने तिकडे जाण्यास नकार दिला होता. तेव्हापासूनच ती शो मध्ये दिसत नाही. तर आता शेवटच्या काही दिवसांत ही ती दिसणार नसल्याचं म्हटलं जातं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार ती फिनाले मध्येही दिसणार नाही.
  दरम्यान इंडियन आयडॉल आणि नेहा कक्कर यांच्याकडून याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण नेहा सध्या तिच्या कामातून ब्रेक घेऊ इच्छित आहे. व काही वेळ पती रोहनप्रित सोबत घालवू इच्छित आहे. त्यामुळे तिने हा निर्णय घेतला आहे. असं सांगण्यात येत आहे.

  श्रेयस तळपदेचं छोट्या पडद्यावर कमबॅक; 'या' मराठी मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

  गेल्या काही दिवसांपासून नेहा आई (Neha Kakkar Pregnancy) होणार असल्याच्या बातम्या देखील येत होत्या. नेहा प्रेग्नंट (Pregnant) असल्याचं म्हटलं जातं होतं. त्यामुळे नेहा खरचं आई होणार आहे का व त्यामुळेच तिने हा निर्णय घेतला आहे का असे प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले आहेत.
  Published by:News Digital
  First published: