मुंबई,22 जानेवारी : प्रसिद्ध अभिनेत्रीं रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांनी हिंदीबरोबरच मराठी चित्रपटांमध्ये देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या कारकिर्दीत आणि लहानपणापासून त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला आहे. नेटफ्लिक्सवरील (Netflix) Behensplaining च्या एका एपिसोडमध्ये त्यांनी आपल्या आई वडिलांच्या घटस्फोटावर भाष्य केलं.
रेणुका या आठ वर्षाच्या असताना त्यांचे आई वडील विभक्त झाले. परंतु आई वडिलांच्या या निर्णयाचा त्यांच्यावर मोठा परिणाम झाल्याचे आज देखील पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात त्यांनी आपल्या या अनुभवाविषयी बोलताना आई वडील विभक्त झाल्यानंतर समाज त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागला. त्यांच्याबरोबर मोठा भेदभाव केला गेल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. लोक आपल्या मुलांबरोबर त्यांना खेळू देत नसल्याचा आपला अनुभव शहाणे यांनी यावेळी व्यक्त केला.
वयाच्या 8 व्या वर्षी आई वडील विभक्त झाल्याचा मोठा परिणाम होण्याबरोबर आजही त्याचे कटू अनुभव आहेत, असं रेणुका यावेळी म्हणाल्या. अनेकजण त्यांच्या मुलांना आम्हाला बहीण भावंडांबरोबर खेळू देत नव्हेते. ते तुटलेल्या कुटुंबातील असल्याची टिप्पणी नागरिक त्यावेळी करत असतं. त्यांची मुलं आमच्याबरोबर खेळली तर त्यांचेही कुटुंब देखील तुटेल अशी त्यांची भावना होती. त्यामुळे त्यावेळी याबाबत खूपच दुःख झाल्याचा अनुभव त्यांनी व्यक्त केला.
हे वाचा : या अभिनेत्रीचं बिकिनीवरून झालं भयानक ट्रोलिंग, INSTAGRAM वर मांडलं सडेतोड मत)
दरम्यान, रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. त्यानंतर आता त्या दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाय ठेवत असून त्यांनी ‘त्रिभंगा’ या चित्रपटातून दिग्दर्शनाची सुरुवात केली. नेटफ्लिक्सवर (Netflix) रिलीज झालेल्या या चित्रपटामध्ये काजोलने ओडिसी डान्सरची भूमिका केली आहे. काजोलबरोबर (Kajol) या चित्रपटात तन्वी आजमी आणि मिथिला पालकर यांनी देखील मूख्य भूमिका साकारल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.