मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /या अभिनेत्रीचं बिकिनीवरून झालं भयानक ट्रोलिंग, INSTAGRAM वर मांडलं सडेतोड मत

या अभिनेत्रीचं बिकिनीवरून झालं भयानक ट्रोलिंग, INSTAGRAM वर मांडलं सडेतोड मत

आपला समाज अजूनही महिलांबाबत पुढारलेला नाही. त्यांना कपड्यांसह अनेक बाबतीत भयानक शेरेबाजीचा सामना करावा लागतो.

आपला समाज अजूनही महिलांबाबत पुढारलेला नाही. त्यांना कपड्यांसह अनेक बाबतीत भयानक शेरेबाजीचा सामना करावा लागतो.

आपला समाज अजूनही महिलांबाबत पुढारलेला नाही. त्यांना कपड्यांसह अनेक बाबतीत भयानक शेरेबाजीचा सामना करावा लागतो.

मुंबई, 21 जानेवारी : सेलेब्रिटीज सोशल मीडियावर (social media) सतत आपले फोटोज शेअर करत असतात. या आकर्षक, ग्लॅमरस फोटोजसाठी अनेकदा त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. अभिनेत्री डोनल बिष्टसोबतही (Bollywood actress donal bisht) हेच झालं.

डोनलनं सोशल मीडियावर आपले काही फोटोज शेअर केले. यात तिनं बिकिनी (bikini) घातलेली होती. यावर अनेकांनी लाइक्स आणि कौतुकाच्या कमेंट्सच्या वर्षाव केला. मात्र अनेक युजर्सनी यावर अतिशय अवमानास्पद आणि विचित्र कमेंट्स केल्या. आता या ट्रोलिंगसंदर्भांनं (trolled) या अभिनेत्रीनं आपल्या भावना आणि दृष्टिकोन मांडणारी एक स्टोरी शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Donal Bisht (@donalbisht)

इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केलेल्या या स्टोरीमध्ये तिनं लिहिलं आहे, 'कुठल्याही महिलेचं चरित्र तिचे कपडे ठरवू शकत नाहीत. आपण कुठल्याही महिलेबाबतचं (woman) मत तिच्या कपड्यांवरून नाही तर वागणुकीवरून ठरवलं पाहिजे. मला कुठले कपडे आवडतात याबाबत कुणाचंच काही म्हणणं असण्याचं कारण नाही. या वाईट कमेंट्स हेच दर्शवतात, की जो कोणी या कमेंट्स करतं आहे, त्यांची विचारसरणी किती नीच आहे. महिलांना पूर्ण स्वातंत्र्य असलं पाहिजे, की त्यांनी केव्हा, कुठं, कसे कपडे घालावेत. मी या जगातली अशी पहिली व्यक्ती नाही, की जिनं बिकीनी घातली आहे. मग या गोष्टीसंदर्भानं इतका तमाशा का म्हणून करायचा?

विशेष म्हणजे, डोनलला नेहमीच वादांपासून दूर राहणं आवडतं. मात्र अनेकदा लोकच तिच्याबाबत निष्कारण वाद निर्माण करतात. सर्वात वाईट काय, तर या सगळ्याचा परिणाम तिच्या कुटुंबावरही होतो. डोनल सांगते, की अनेकदा माझी आई या सगळ्या प्रकारामुळे खूप अस्वस्थ होते. मी बऱ्याचदा या सगळ्याकडं दुर्लक्षही करते. जगण्याची चांगली बाजूच ठळक करून पाहण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो.

First published:
top videos

    Tags: Bollywood actress, Instagram