मुंबई, 30 डिसेंबर: बॉलिवूड (Bollywood) मधील प्रसिद्ध कोरिओग्राफर, डान्सर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझा यांना (Remo D’Souza) काही दिवसांपूर्वी रुग्णायलातून डिस्चार्ज मिळाळा. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांची प्रकृती ठीक असून त्यांनी मित्रपरिवाराबरोबर ख्रिसमस एन्जॉय करताना काही व्हिडीओ देखील शेअर केले होते. दरम्यान रेमो यांनी या कठीण काळात सलमानने पाठिंबा दिल्याबाबत त्याचे आभार मानले आहेत.
हृदयविकाराच्या झटक्याबाबत बोलताना रेमो डिसूझा असं म्हणाले की ते स्वत: या प्रकारानंतर आश्चर्यचकित झाले आहेत. मात्र आता ते बरे होत असल्याने, डॉक्टरानी उपचार केल्यानंतर सर्व अहवाल नॉर्मल येत असल्याने, आनंदी असल्याचही रेमो म्हणाले आहेत. एका मुलाखती दरम्यान त्यांनी सांगितले की, त्यादिवशी सर्व काही नेहमीप्रमाणेच होतं, मी नाश्ता केला आणि जिममध्ये गेलो. रेमो यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची पत्नी लिझेल आणि रेमो यांना त्यांचा ट्रेनर ट्रेनिंग देत होता. त्या दोघांचा ट्रेनर एकच आहे. लिझेल यांचं ट्रेनिंग सुरू होतं असल्याने रेमो त्यांचं
ट्रेनिंग सुरू होण्याची वाट पाहत होते. त्याठिकाणी त्यांनी ट्रेडमिलवर ब्रिस्ट वॉक अशा काही एक्सरसाइज देखील केल्या. जेव्हा लिझेल यांचं ट्रेनिंग संपलं त्यावेळी त्यांच्या छातीमध्ये दुखण्यास सुरुवात झाली. त्यावेळी त्यांना ती अॅसिडिटी वाटली. पण पाणी प्यायल्यानंतरही आराम न पडल्याने रेमो यांनी ट्रेनरला ट्रेनिंग रद्द करण्यास सांगितलं.
(हे वाचा-पूनम पांडेचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक, चुकीचा वापर होऊ नये याची वाटतेय भीती)
त्यानंतर लिफ्टजवळ गेल्यानंतर रेमो यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती त्यांनी दिली. रेमो यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, तो त्यांच्या आयुष्यातील सर्वात भयावह प्रसंग होता. यावेळी बोलताना रेमो यांनी सलमान खानने या कठीण प्रसंगात मदत केल्याचे सांगितले. रेमो यांनी सलमानला 'देवदूत' म्हटलं आहे. त्यांनी असं म्हटलं की, 'सलमानबरोबर मी काम केलं आहे. ते देवदूत आहेत कारण त्यांचं मन सोन्यासारखं आहे. ते खूप चांगले व्यक्ती आहेत. सलमान आणि मी जास्त बातचीत नाही करत. मी केवळ त्यांना सर, हा सर, ओके सर बोलत असतो.' टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
(हे वाचा-IT रिटर्न भरताना कशाप्रकारे कराल ई-व्हेरिफिकेशन? वाचा सविस्तर)
रेमो यांनी अशी माहिती दिली की सलमान आणि त्यांची पत्नी लिझेल यांच्यात चांगले संबंध आहेत. मला जेव्हा रुग्णालयात भरती करण्यात आलं, त्यावेळी सलमानने लिझेलला फोन केला होता. माझी काळजी कशी घेतली जातेय याची चौकशी सलमान घेत असे. या सर्व मदतीसाठी त्यांनी सलमानचे आभार मानले आहेत.