मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /पूनम पांडेचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक, चुकीचा वापर होऊ नये याची वाटतेय भीती

पूनम पांडेचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक, चुकीचा वापर होऊ नये याची वाटतेय भीती

पूनम पांडे (Poonam pandey) सायबर क्राइमची (Cyber crime) बळी पडली असून तिचं सोशल मीडिया अकाउंट हॅक (Social media account Hack) करण्यात आलं आहे. या अकाउंट पुन्हा रिकव्हर (recover) करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

    मुंबई, 29 डिसेंबर  : बॉलीवूड अभिनेत्री (Bollywood actor) आणि मॉडेल (Model) पूनम पांडे (Poonam Pandey) तिच्या बोल्डनेसमुळे (Boldness) नेहमीच चर्चेत असते. पण मागील काही दिवसांपासून ती वैयक्तिक आयुष्यात (Personal Life) असणाऱ्या वादामुळे ती चर्चेत होती. लग्नानंतर (Marriage) तिने तिच्या पतीवर घरगुती हिंसाचारासारखा (Domestic Violence ) गंभीर आरोप लावला होता. पण त्यानंतर दोघांमध्ये सर्वकाही ठीक झालं. शिवाय महिन्याभरात तिने गोवा बीचवर (Goa Beach) एक अश्लील व्हिडिओ शुट (Nude video shoot) केला म्हणून तिच्या कारवाईची मागणी करण्यात आली होती.

    यावेळी पूनम पांडे एका धक्कादायक कारणामुळे चर्चेत आली आहे.  मीडिया रिपोर्टनुसार पूनम पांडे सायबर क्राइमची बळी पडली असून तिचे सोशल मीडिया अकाउंट हॅक करण्यात आलं आहे. तिचं Instagram अकाउंट हॅक झाल्याची तिची तक्रार आहे. या अकाउंट पुन्हा रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण तिला एका वेगळ्या गोष्टीची भीती आहे.

    पूनम पांडेच इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालं आहे. पूनमने स्वत: ही माहिती सांगितली आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी झालेल्या संभाषणादरम्यान तिनं आपलं इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याची सर्व माहिती शेअर केली आहे. तिने सांगितलं की, ती खूप अस्वस्थ आहे. कारण ती इन्स्टाग्रामवर खूपच सक्रिय असते. तिचं अकाउंट हॅक झाल्यामुळे तिला फोल्लोवर्स पासून दूर राहावं लागत आहे. तिने बरीच वर्ष मेहनत केल्यानंतर तिला हा फॅनबेस तयार करता आला आहे. त्यामुळे याचा चुकीचा वापर होऊ नये, अशी भीती तिला आहे.

    पूनम पांडेचे ​​फॉलोअर्स सध्या ट्विटर माध्यमातून तिच्याशी जोडले गेले आहेत. पूनमने यापूर्वीच एक नवीन पेजही तयार केलं आहे. तिथेही आता ​​फॉलोअर्सची संख्या वाढताना दिसत आहे. पूनमने तिच्या मुलाखतीत ​​फॉलोअर्सना विनंती केली आहे की, तिच्या जुन्या अकाऊंटवरून काही आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केला गेला तर त्यावर प्रतिक्रिया देऊ नका.

    First published:

    Tags: Poonam pandey