जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / रेमो डिसूझाच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट, वरुण धवन म्हणतो...

रेमो डिसूझाच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट, वरुण धवन म्हणतो...

रेमो डिसूझाच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट, वरुण धवन म्हणतो...

रेमो डिसूझा नेहमीच त्याच्या डान्स शो किंवा सिनेमांमुळे चर्चेत असतो मात्र तिसऱ्यांदा लग्न केल्यामुळे सध्या सोशल मीडियावर रेमोच्या नावाची चर्चा आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 08 ऑक्टोबर : बॉलिवूड निर्माता आणि डान्स कोरिओग्राफर रेमो डिसूझानं पुन्हा एकदा लग्न केल्यानं सध्या खूप चर्चेत आहे. रेमो डिसूझा नेहमीच त्याच्या डान्स शो किंवा सिनेमांमुळे चर्चेत असतो मात्र तिसऱ्यांदा लग्न केल्यामुळे सध्या सोशल मीडियावर रेमोच्या नावाची चर्चा आहे. या लग्नात फक्त वर-वधू पक्षातील काही मोजक्या व्यक्ती आणि बॉलिवूडमधील काही कलाकारांनी हजेरी लावली होती. रेमो डिसूझा आणि त्याची पत्नी लिजेल यांच्या लग्नाला 20 वर्षं पूर्ण झाली. या निमित्तानं रेमोनं पत्नी लिजेलसोबत तिसऱ्यांदा लग्न केलं. लग्नाचा वाढदिवस आणखी खास बनवण्याच्या उद्देशानं रेमो आणि लिजेल ख्रिश्चन रिती-रिवाजनुसार पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकले. बेडरुममध्ये प्रियांका-फरहानचा रोमान्स, ‘द स्काय इज पिंक’चा UNSEEN VIDEO लीक

जाहिरात

या लग्नात वरुण धवन सुद्धा पोहोचला होता. त्यानं या लग्नाचा एक फोटो सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत या दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या फोटोला कॅप्शन देताना वरुणनं लिहिलं, ‘लोक एकदा लग्न करत नाही आणि तुम्ही 3 वेळा केलं. मला वाटतं 3 लकी आहे.’ राखी सावंतनं खरंच केलं लग्न! वाचा तिच्या पतीचा पहिला INTERVIEW

जाहिरात

वरुण आणि श्रद्धा लवकरच रोमोच्या ‘स्ट्रीट डान्सर 3डी’मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा ‘एबीसीडी’ सीरिजचा तिसरा पार्ट आहे. काही दिवसांपूर्वीच वरुणनं या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं. रेमोच्या लग्नाचे फोटो वरुणनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले मात्र त्याखाली लिहिलेल्या कॅप्शनमुळे आता रेमोसोबत वरुण सुद्धा चर्चेचा विषय ठरत आहे. वडिलांनी सोडली साथ, मोठ्या भावाचं निधन, KBC स्पर्धकाची कहाणी ऐकून बिग बी भावुक ============================================================== VIDEO : अंगावर रोमांच उभी करणारी तलवारबाजीची थरारक प्रात्याक्षिकं

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात