Elec-widget

KBC मध्ये विचारला मोदी सरकारशी संबंधित प्रश्न, तुम्हाला माहित आहे का याचं उत्तर?

KBC मध्ये विचारला मोदी सरकारशी संबंधित प्रश्न, तुम्हाला माहित आहे का याचं उत्तर?

सोनी टीव्हीवरील शो कौन बनेगा करोडपतीमध्ये जनरल नॉलेजसोबतच मोदी सरकारशी संबंधितही काही प्रश्न विचारण्यात आले.

  • Share this:

मुंबई, 09 ऑक्टोबर : सोनी टीव्हीवरील शो कौन बनेगा करोडपतीला सध्या प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. या सीझनमध्ये आतापर्यंत 2 स्पर्धक करोडपती झाले आहेत. पण या शोमध्ये जनरल नॉलेजसोबतच मोदी सरकारशी संबंधितही काही प्रश्न विचारण्यात आले. दरम्यान या शोमध्ये एका अशा स्पर्धकानं हजेरी लावली, जो पंतप्रधान मोदींचा खूप मोठा चाहता आहे आणि याचा खुलासा त्यानं केबीसीमध्ये केला.

गुरुवारच्या एपिसोडमध्ये विचारण्यात आला मोदी सरकारशी संबंधित हा प्रश्न

केबीसीच्या 11 व्या सीझनमध्ये गुरुवारी झालेल्या एपिसोडमध्ये मूळ बिहारचा पण सध्या पंजाबमध्ये राहत असलेल्या अभिषेक झा ला अमिताभ बच्चन यांनी मोदी सरकारशी संबंधित प्रश्न विचारला. अभिषेकला विचारण्यात आलं, मे 2019 मध्ये स्थापन झालेल्या नव्या कॅबिनेट मंंत्रालयातील असे एकमेव मंत्री कोण आहेत. ज्यांचा जन्म भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी झाला आहे. अभिषेकनं या प्रश्नचं अचूक उत्तर दिलं होतं. याचं उत्तर होतं, राम विलास पासवान.

VIDEO : रणवीर सिंहला सर्वांसमोर ओरडली अनुष्का शर्मा, चाहते का देतायत शाबासकी

राम विलास पासवान यांचा जन्म भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या एक वर्ष अगोदर म्हणजे 5 जुलै 1946 ला बिहारच्या खगरिया या गावात झाला. आता ते 73 वर्षांचे आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 ला गुजरातच्या वडनगरमध्ये झाला. पंतप्रधान मोदी आता 69 वर्षांचे आहेत.

Loading...

केबीसीमध्ये संबित पात्रांचा उल्लेख

या अगोदर केबीसीच्या एका एपिसोडमध्ये भाजप प्रवक्ता संबित पात्रा यांचा उल्लेख करण्यात आला होता. 16 सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये 20 हजाराच्या प्रश्नांसाठी संबित पात्रा यांच्या नावाचा पर्याय देण्यात आला होता आणि यातील खास गोष्ट अशी की, या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊन पुढे गेलेल्या सनोज यांनी 1 कोटी जिंकत केबीसी 11 चा पहिला करोडपती होण्याचा मान मिळवला होता.

बॉलिवूडमध्ये येण्याआधी मासे विकायची ट्विंकल खन्ना? वाचा काय आहे सत्य

काय होता प्रश्न

केबीसीच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच 20 हजाराच्या प्रश्नासाठी देशातील राजकीय व्यक्तीचा आवाज ऐकवण्यात आला. त्यानंतर हा आवाज स्पर्धकाला ओळखायचा होता आणि यातील पर्यायांमध्ये राजनाथ सिंह, अमित शाह, रविशंकर प्रसाद यांच्यासोबतच शेवटचा पर्याय संबित पात्रा यांचंही नाव देण्यात आलं होतं.

अमिताभ बच्चन यांचं खरं नाव 'इन्कलाब'? बिग बींनी स्वतः सांगितलं सत्य

भाजप प्रवक्ते संबित पात्रा नेहमीच काही ना काही कारणानं सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांचा स्वतःचा वेगळा चाहता वर्गही आहे. बिहारच्या सनोज यांना हा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी सुरुवातीलाच या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट झालं होतं. कारण हा आवाज देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा होता. पण सर्व पर्याय ऐकल्यानंतर सनोजनं शेवटी अमित शाह यांचं नाव घेतलं.

=========================================================

आईच्या कुशीतून 8 महिन्यांच्या बाळाला पळवलं, धक्कादायक CCTV VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2019 02:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...