मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ज्याचे चित्रपट भाड्याने टीव्ही आणून पाहिले, त्या रिअल भिडूसोबत रवी जाधव करणार काम

ज्याचे चित्रपट भाड्याने टीव्ही आणून पाहिले, त्या रिअल भिडूसोबत रवी जाधव करणार काम

दिग्दर्शक रवी जाधव यांनी कुछ तो रापचीक हो रहेला है भीडू... अशी पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. सध्या त्यांची ही रापचीक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

दिग्दर्शक रवी जाधव यांनी कुछ तो रापचीक हो रहेला है भीडू... अशी पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. सध्या त्यांची ही रापचीक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

दिग्दर्शक रवी जाधव यांनी कुछ तो रापचीक हो रहेला है भीडू... अशी पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. सध्या त्यांची ही रापचीक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 25 नोव्हेंबर- मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव (ravi jadhav )यांनी कुछ तो रापचीक हो रहेला है भीडू... अशी पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. सध्या त्यांची ही रापचीक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

रवी जाधव यांनी इन्स्टावर एक पोस्ट केली आहे सोबत एक फोटो देखील शेअर केला आहे. यावर कमेंटचा वर्षाव सुरू आहे.रवी जाधव यांनी इन्स्टावर पोस्ट करत म्हटलं आहे की, हिरो, राम लखन, परींदा, कर्मा, त्रिदेव… भाड्याने VCR आणि कलर TV आणून हे चित्रपट अनेक वेळा पाहिले तेव्हा माहित नव्हते एक दिवस या रियल हिरो सोबत काम करायला मिळेल. ♥️कूछ तो रापचीक हो रहेला है भीडू!!! बाकी तपशील लवकरच) सोबत सर्वांचा भिडू म्हणजे अभिनेते जॅकी श्रॉफ (jackie shroff)  यांच्यासोबत एकदम रापचीक फोटो शेअर केला आहे.

वाचा :It's Official! मराठी टेलिव्हिजनवर सलमान खान, Bigg Boss Marathi च्या चावडीवर भाईजानची एंट्री

यावरून असं लक्षात येत आहे की, लवकरच जॅकी श्रॉफ रवी जाधव यांच्या सिनेमात दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे जॅकी श्रॉफ यांना मराठी सिनेमात पाहण्यासाठी चाहते मंडळी देखील उत्सुक आहेत. चाहत्यांनी या दोघांना एकत्र पाहून आनंद व्यक्त केला आहे.

काही दिवसापूर्वी जॅकी श्रॉफ ‘सूर्यवंशी’च्या प्रमोशनसाठी ‘चला हवा येऊ द्या’या शोमध्ये आले होते. तेव्हा त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांची ही इच्छा लगेच पूर्ण झाली, असं म्हणायला हरकत नाही. यापूर्वी जॅकी यांनी हृदयनाथ या मराठी चित्रपटामध्ये काम केलं आहे. त्यामुळं जॅकी श्रॉफ यांना मराठी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते मात्र उत्सुक आहेत.

वाचा :VIDEO: एका महिन्यात कमी करा 5Kg वजन; जॉन अब्राहमनं कपिल शर्माला दिल्या वेट लॉस टिप्स

जॅकी श्रॉफ यांचे मराठी प्रेम सर्वांना माहित आहे. त्यांना मराठी पदार्थ देखील खायला आवडतात.अनेकदा ते मराठी बोलताना दिसतात. बॉलिवूडमधील असे अनेक कलाकार आहेत ज्यांना मराठी पदार्थ खायला आवडतात. अनेक बॉलिवूड कलाकार सध्या मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त करतात. सलमान खान असेल तसेच माधुरी दीक्षित यासारख्या बॉलिवूड स्टारसनी देखील मराठी सिनेमात काम केले आहे.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Jackie shroff, Marathi entertainment