Home /News /entertainment /

अभिनेत्री अपूर्वाला नेमळेकरला 'या' ठिकाणी श्वास घेणं होतं कठीण, हवीय मोकळी जागा

अभिनेत्री अपूर्वाला नेमळेकरला 'या' ठिकाणी श्वास घेणं होतं कठीण, हवीय मोकळी जागा

अभिनेत्री अपूर्वाला नेमळेकरला 'या' ठिकाणी श्वास घेणं होतं कठीण, हवीय मोकळी जागा

अभिनेत्री अपूर्वाला नेमळेकरला 'या' ठिकाणी श्वास घेणं होतं कठीण, हवीय मोकळी जागा

सोशल मीडियावर सक्रीय असलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरनं एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याची चांगलीच चर्चा होत आहे.

  मुंबई, 22 जून: रात्रीस खेळ चाले ( Ratris Khel Chale) फेम शेवंता ( Shevanta) म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ( Apurva Nemlekar) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. अपूर्वानं नुकतीच तिच्या आईबरोबर दुबईची टूर केली. ट्रिपचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर शेअर केले होते. तिच्या सगळ्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळाली. अपूर्वा आईसह काही दिवसांपूर्वीच मुंबईत परतली आहे. मुंबईत येताच अपूर्वाची भटकंती पुन्हा एकदा सुरू झाली आहे. मात्र अपूर्वाला काही ठिकाणी श्वास घेण्यास त्रास होतो तिला मोकळी जागा लागते. असं आम्ही तर अपूर्वाचं म्हणत आहे. तिची पोस्ट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. अपूर्वानं तिच्या सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.  ज्यात ती अंतराळवीराच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. हे फोटो शेअर करत अपूर्वानं लिहिलंय, ' दूषित विचार असलेल्या हवेत श्वास घेणं फार कठीण आहे. मला मोकळी जागा हवी आहे'. या कॅप्शनसह अपूर्वानं #Realitycheck असा हॅशटॅगही शेअर केला आहे. अपूर्वानं अशी पोस्ट का लिहिली असावी असा प्रश्न देखील तिच्या चाहत्यांना पडला आहे. मात्र तिचे कमाल फोटो तिच्या चाहत्यांना आवडले आहेत.
  अपूर्वानं तिची आई, बहिण आणि भाचीबरोबर वरळीच्या नेहरु सेंटरला भेट दिली. तिथे तिनं हे फोटो काढले आहेत. हेही वाचा - Tu Tevha Tashi: अनामिकाच्या आईचं अस्खलित हिंदी ऐकलंत का? हसून हसून डोळ्यात येईल पाणी! अपूर्वानं अंतराळवीराच्या वेशात फोटो काढला आहे. अपूर्वानं तिच्या पुढच्या पोस्टमध्ये आई, बहिण आणि भाची यांच्याबरोबर व्हिडीओ शेअर करुन 'माझी श्वास घेण्याची जागा' असं म्हटलं आहे. फिरुन झाल्यानंतर अपूर्वानं भाची  अदिकाबरोबर धम्माल मस्ती देखील केली.  अपूर्वाने फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
  अपूर्वा तिच्या फॅमिलीबरोबर फार कनेक्टेड आहे. अपूर्वाचं लग्नही झालं आहे मात्र तिच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आल्याचं म्हटलं जात आहे. अपूर्वाच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर अपूर्वा सध्या कोणत्याच टेलिव्हिजन प्लॅटफॉर्मवर दिसत नाहीये पण ती तिच्या अपकमिंग प्रोजेक्टवर काम करत आहे.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Tv celebrities, TV serials, Tv stars, Zee Marathi, Zee marathi serial

  पुढील बातम्या